स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करा, सोशल मीडियाचा वापर वाढवा, महाराष्ट्र काँग्रेसमय करा

जातनिहाय जनगणनेसाठी राहुल गांधींनी घेतलेल्या भूमिकावर जनजागृती करा: सचिन राव पुणे: राज्यात जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका होत आहेत. या निवडणुका अत्यंत महत्वाच्या असून काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी विषयवार कामाची जबाबदारी घेतली पाहिजे. प्रभाग रचना, गट व गण तसेच मतदार याद्यांचा अभ्यास करा व काही हरकती असतील तर त्या नोंदवल्या पाहिजेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न […]

अधिक वाचा..

महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करा

ठाणे: कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अंतर्गत जिल्हास्तरावर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हास्तरीय स्थानिक समिती कार्यरत असते. शासन निर्णय क्र.मकची-२०१४/ प्र.क्र.६३/ मकक दि.११ सप्टेंबर, २०१४ अन्वये जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर स्थानिक समिती गठीत करण्यासाठी अध्यक्ष व सदस्य पदासाठी खालीलप्रमाणे अनुभव असलेल्या व्यक्तींकडून […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांची अवैध दारू विरोधात धडक मोहीम; गावठी आणि विदेशी दारू जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे):  शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर अंकुश आणण्यासाठी सलग चार ठिकाणी धडक कारवाया करत गावठी हातभट्टी दारू व विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवायांमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. पहिली कारवाई मलठण येथे केली असून (दि. २३) एप्रिल रोजी मौजे मलठण परिसरात अवैध दारू […]

अधिक वाचा..

जबरी चोरीचा छडा! स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई, दोन आरोपी जेरबंद

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन येथे दिनांक ५ एप्रिल रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 233/2025, BNS 309(4), 3(5) प्रमाणे नोंदविण्यात आला होता. फिर्यादीस कामाचे आमिष दाखवून दोन अज्ञात आरोपींनी त्याच्याच गाडीवरून प्रवास केला. गाडी […]

अधिक वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नका

एसटीची केलेली दरवाढ मागे घ्या, ही गरीब जनतेची लूट  नागपूर: एसटी ही महाराष्ट्रातील जनतेची जीवनवाहिनी आहे. गरीब, मजूर, महिला , कामगारांसाठी एसटी असताना त्यांना वेठीस धरणे योग्य नाही. त्यामुळे एसटी दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. नागपूर इथे पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की एसटी मध्ये भ्रष्टाचार होत आहे, बस […]

अधिक वाचा..

धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर अत्याचाराचा प्रकार संतापजनक…

मुंबई: मुंबईत धावत्या लोकलमध्ये परीक्षेला निघालेल्या विद्यार्थीनीवर एका नराधमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, ही घटना अत्यंत संतापजनक आहे. गेल्या काही दिवसात राज्यात महिलांवरील अत्याचारात झालेली वाढ चिंताजनक असून गृहखात्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा तीव्र शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या घटनेचा निषेध केला आहे. दरम्यान या घटनेचा युध्दपातळीवर […]

अधिक वाचा..