शिरुर; न्हावरे रस्त्यावर दुचाकीवरुन पडुन जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुख्य बातम्या शिरूर तालुका

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरा रोड येथे दुचाकीवरुन पडून गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा तब्बल नऊ दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु असताना या युवकाने अखेरचा श्वास घेतला. मच्छिंद्र भारत सोनवणे (वय २६, रा. उमरखेड, तांदुळवाडी, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मच्छिंद्र सोनवणे हे दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास शिरुर तालुक्यातील न्हावरे रोड परिसरात दुचाकीवरुन पडून जखमी झाले होते. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, मृत्यूशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेबाबत ससून रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या वैद्यकीय माहितीच्या आधारे सुरुवातीला माळेगाव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर शिरुर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू अन्वये आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलमाप्रमाणे नोंद करण्यात आली असुन या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत. 

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यात अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतणाऱ्या तिघांना ट्रकने चिरडले

शिरूर! कारेगावात तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राचा वार करत थेट जीव घेण्याचा प्रयत्न

शिरूर तालुक्यात दिवसाढवळ्या चोरी; घरातून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत