शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस स्टेशन येथे दिनांक ५ एप्रिल रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन आरोपींना अटक करून महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. गुन्हा शिरूर पोलीस स्टेशन गु.र.नं. 233/2025, BNS 309(4), 3(5) प्रमाणे नोंदविण्यात आला होता.
फिर्यादीस कामाचे आमिष दाखवून दोन अज्ञात आरोपींनी त्याच्याच गाडीवरून प्रवास केला. गाडी काही अंतर गेल्यावर कच्चा रस्ता पकडून लघवीसाठी गाडी थांबवण्याचा बहाणा केला. त्यानंतर फिर्यादीस मारहाण करत गाडीतून खाली ढकलून दिले आणि त्याची टीव्हीएस ज्युपिटर मोटारसायकल व Itel कंपनीचा मोबाईल असा एकूण 35,000/- रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला होता.
या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी मारुती मसाराव मस्के (वय 23, रा. कुंभारी, ता. पुसद, जि. यवतमाळ) यास त्याच्या विधीसंघर्षित भावासोबत अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपीस शिरूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अति. पो. अधीक्षक रमेश चोपडे, व पो. उप अधीक्षक प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे पो.नि. अविनाश शिळीमकर, पो.हवा तुषार पंदारे, पो.हवा जनार्धन शेळके, पो.हवा संजू जाधव, व पो.हवा राजू मोमीन यांनी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या या तात्काळ व परिणामकारक कारवाईमुळे परिसरात नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास सुरू आहे