मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर

मुंबई: मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची अधिकृत घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यात विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कार जाहीर केले. सन २०२२ चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार प्रा. चंद्रकुमार नलगे यांना जाहीर करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभागाची अनास्था! मुंबईत ICSE बोर्डाच्या शाळांत मराठी भाषा अनाथ…

मुंबई: २४ जानेवारी रोजी २०२३ ICSE बोर्डाच्या मुंबईतील सर्व मुख्याध्यापकांची बैठक पार पाडली. ही बैठक केवळ मराठी भाषा ९ वीला लावायची की नाही यासाठी आयोजित केली होती. यात येत्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ८ वीच्या विध्यार्यांना ९ वी पासून मराठी हा विषय सर्व अनिवार्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरील बैठकीत जो पर्यंत शालेय शिक्षण विभाग […]

अधिक वाचा..

मराठी संशोधन मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाची होणार सांगता…

मुंबई: दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मराठी संशोधन मंडळाची स्थापना १ फेब्रुवारी १९४८रोजी झाली. ही संशोधन क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे जिचे २०२२-२३ हे अमृतमहोत्सवी वर्ष असून त्याची सांगता १ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार आहे. यंदाचे वर्ष हे मुंबई मराठीग्रंथसंग्रहालयाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे! वर्षभरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाअंतर्गत मराठी संशोधन मंडळाचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?

मुंबई: सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची […]

अधिक वाचा..

मराठी चित्रपट निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांना पितृशोक…

मुंबई: नुकताच येऊन गेलेल्या ‘वऱ्हाडी वाजंत्री’ या चित्रपटाचे निर्माते कॅप्टन कल्पेश मगर यांचे वडील रविंद्र हरिभाऊ मगर यांचे नुकतेच अल्पशा आजाराने मुंबईत निधन झाले आहे. गेली काही दिवस ते आजारी होते. त्यांच्यावर कांदिवली येथील ‘विन्स हॉस्पिटल’मध्ये उपचार सुरु होते. प्रकृतीत सुधारणा जाणवल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते. मात्र काही दिवसांत पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर २ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी अर्जुन बढे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन शिरुर येथे झालेल्या बैठकीत तसे निवडीचे पत्र त्यांना जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांनी दिले. यावेळी जिल्हाकार्यकारणी शरद पुजारी, शिरुर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे, माजी तालुकाध्यक्ष जालिंदर आदक, हवेली तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, उपाध्यक्ष सुनिल पिंगळे, […]

अधिक वाचा..
Ajit Pawar

राज्य मराठी विकास संस्थेची मुंबईतील जागा कायम ठेवा…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य मुंबई: मराठी भाषा विकासासाठी काम करणाऱ्या राज्य मराठी विकास संस्थेला, मुंबईतील एल्फिन्स्टन तंत्रज्ञान संस्थेच्या आवारात पहिल्या मजल्यावर असलेली जागा खाली करण्याबाबतचे पत्र कौशल्य विकास विभागाने पाठवले आहे. त्यामुळे राज्याच्या राजधानीतच आपल्या मराठी भाषेला बेघर होण्याची वेळ आल्याचा महत्वाचा विषय विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

अरुंधतीला मिळाला नवीन प्रोजेक्ट…

मुंबई: ‘आई कुठे काय करते’ मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सामान्य घरातील एका गृहिणीवर आधारित ही मालिका असून अरुंधती या पात्राभोवती मालिकेचं संपूर्ण कथानक फिरताना दिसतं. या मालिकेतील अरुंधतीला ही भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर हिने अभिनयामुळे अनेकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेमुळे मधुराणीला एक वेगळी ओळख मिळाली. मधुराणी हे […]

अधिक वाचा..

Video: मराठी चित्रपटातील ‘आवडाक्का’ काळाच्या पडद्याआड…

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज (रविवार) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. ‘दे दणादण’ चित्रपटातील ‘आवडाक्का’ ही भूमिका प्रचंड गाजली होती. प्रेमा किरण यांनी चित्रपटांमध्ये भूमिका साकारतानाच निर्मात्या देखील बनल्या होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती […]

अधिक वाचा..