मराठी साहित्याला मातीचा गंध देणारा ‘रानकवी’ हरपला

मुंबई: “ज्येष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर खऱ्या अर्थानं ‘रानकवी’ होते. निसर्गाच्या सानिध्यात राहून त्यांनी साहित्यसेवा केली. मराठी साहित्याला मातीचा गंध दिला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं जीवन, ग्रामीण संस्कृतीचं वैभव मराठी साहित्यात आणलं. त्यांच्या ‘रानातल्या कवितां’नी वाचकांना निसर्गाची सहल घडवली. मराठवाडी बोलीतल्या ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ ‘पळसखेडची गाणी’ सारख्या लोकगीतांनी मराठी साहित्य समृद्ध केल. कवयित्री बहिणाबाई, बालकवींचा वारसा पुढे […]

अधिक वाचा..

येत्या १ मे, महाराष्ट्र दिनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न करा

मुंबई: महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, 1 मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन महाराष्ट्रदिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली आहे. […]

अधिक वाचा..

मराठी विषय वगळण्यात आलेला नाही; दीपक केसरकर

मुंबई: राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी विषय हा सक्तीचा करण्यात आला आहे. केवळ केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये आठवीच्या यावर्षीच्या वर्गालाच (बॅच) गुणांकनाची सवलत देण्यात आली आहे. मराठी विषय वगळण्यात आलेला नाही, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता राज्य मंडळाच्या शाळांना उद्यापासून सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे त्यांनी […]

अधिक वाचा..

मराठी मनोरंजन सृष्टीच्या विकासासाठी शासनाचे ऑनलाईन फिल्म बाजार पोर्टल लवकरच सुरु होणार

मुंबई: राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात फिल्म बाजार या संकल्पनेअंतर्गत लेखक, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ यांना एकत्र आणून सुलभ चित्रपटनिर्मितीच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी चित्रपटांशी संबंधित व्यक्ती, संस्था यांना एकत्र आणत चित्रपट निर्मितीपासून ते वितरणापर्यंतच्या सोयीसुविधा एकाच छताखाली उपलब्ध करुन देणारे शासकीय पोर्टल लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी दादासाहेब फाळके […]

अधिक वाचा..

मुंबई मराठीग्रंथसंग्रहालय नायगाव शाखा स्नेहसंमेलन

मुंबई: शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नायगांव शाखेचे ७२ वे वार्षिक स्नेहसंमेलन (दि. ३०) मार्च २०२३ रोजी उत्साहात पार पडले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार, लेखक सुधींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.भालचंद्र मुणगेकर कार्यक्रमास उपस्थित होते. डॉ. प्रदीप कर्णिक व प्रमुख पाहुणे सुधींद्र कुलकर्णी व […]

अधिक वाचा..

रौंदळ! शेतकऱ्याचा एल्गार, मराठीतील आर आर आर राजकारणी, शहरी लोकांनीही आवर्जून पहावा…

मुंबई: भारत कृषिप्रधान देश! शेतकरी आपला अन्नदाता! लाखाचा पोशिंदा! मात्र बळीराजा आत्महत्याग्रस्त  होत चाललाय, श्रीमंत शेतकऱ्यांवर अनेक संकटं येतात! ग्रामीण आणि सर्व प्रकारचे राजकारण शेतकऱ्यांच्या जगण्याला बोलून खातेय! अनेकजण दिशाभूल करतात. सहकाराने शेतकऱ्यांचा विकास होणे अपेक्षित म्हणून सहकारातून समृध्दी चे लक्ष ठेवून  शेतकऱ्यांनाही मालकीचा वाटा दिला गेला,पण वर्चस्ववादातून येणारा माज,दमनाची वृत्ती  इथेही गप्प बसत नाही. […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मुलुंड विभागात कुसुमाग्रज जयंती साजरी     

मुंबई: दर वर्षी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहलायाच्या मुलुंड विभागातर्फे येथे ग्रंथालायच्या जागेत मुलुंड येथे कुसुमाग्रज जयंती/ मराठी भाषा दिन  साजरा होतो. यावर्षी या कार्यक्रमात कार्याध्यक्ष शं रा पेंडसे यांच्या ”सत्पत्री दान या कथासंग्रहाचे प्रकाशन कोणाही ”सेलिब्रेटी”च्या हस्ते न करता मुलुंड विभागाचे कार्यवाह महेश कवटकर यांच्या हस्ते करून एक नवीन पायंडा पाडला. याप्रसंगी मुंबई मराठीग्रंथसंग्रहालया च्या शतकोत्तर […]

अधिक वाचा..

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मराठीच्या विविध बोली भाषा व लिपी याविषयीचे प्रदर्शन…

ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई: २७ फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जो सर्व महाराष्ट्रात ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांच्या दादर पूर्व येथील संदर्भ विभागात मराठी भाषेच्या विविध बोली, लिपी- इत्यादी विषयांवर विविध ग्रंथ व लेख यांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

मराठी भाषा सर्वांना सामावून घेणारी भाषा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधानमंडळात ‘साहित्याची ज्ञानयात्रा’उत्साहात संपन्न मुंबई: जी भाषा जात पात विसरून सर्वांना सामावून घेते तीच विश्वाची भाषा बनते, हे सर्व गुण मराठीत आहेत. या भाषेचा वापर अधिक करुन मराठी भाषा अधिक समृध्द करूया.मराठीचा जास्तीत जास्त वापर आपण करीत राहिले पाहिजे. आवर्जून मराठी बोलले,लिहीले पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात […]

अधिक वाचा..

आपल्या माय मराठीने अभिजात भाषेचे चारही निकष पूर्ण केले तरीही…

मुंबई: मराठी भाषेने अभिजात दर्जाचे चारही निकष पूर्ण केले असून गेल्या चौदा वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा तातडीने देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन हा प्रश्न लवकरच मार्गी लावावा अशी मागणी […]

अधिक वाचा..