crime

भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या; जेवणाच्या वादातून चाकू हल्ला

श्रीरामपूर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भरदिवसा हॉटेल मालकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. नेवासा रोडवरील लक्ष्मीनारायण हॉटेलमध्ये जेवणाच्या वादातून तिघा हल्लेखोरांनी हॉटेल मालक आकाश शेखर दुबय्या यांच्यावर धारदार शस्त्राने आणि जड वस्तूंनी जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या आकाश दुबय्या यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर कुणाल दुबय्या किरकोळ जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाले. या घटनेत जाहीद हुसेन रिफाकत हुसेन (वय २८) या तरुणाचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी शेख इम्रान ऊर्फ गोलू (वय २८), शेख अमीन (वय ३४) आणि शेख समीर (वय २७) या तिघांना अटक केली […]

अधिक वाचा..

प्रेमप्रकरणातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा यांची हत्या; आरोपी अटकेत

श्रावस्ती (उत्तर प्रदेश): प्रेमसंबंधातून उद्भवलेल्या वादातून महिला शेतकरी नेत्या आंचल मिश्रा (35) यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुरज वर्मा या आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंचल मिश्रा या किसान युनियनच्या सभेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या बेपत्ता झाल्याने […]

अधिक वाचा..

72 वर्षीय आजीचा खून, नातवाने केला सोन्याच्या चैनीसाठी विषारी चहा दिला

कोल्हापूर: गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिराजवळील शुक्रतारा अपार्टमेंटमध्ये उषा मारुती भिऊंगडे (वय 72) यांच्या मृत्यूचे रहस्य पोलिसांनी उकलले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासानंतर समोर आले की, या खुनामागे त्यांचा चुलत नातू प्रेम परशुराम भिऊंगडे (वय 20) होता. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रेमने चैनीसाठी सोन्याचे दागिने लुटण्याच्या हेतूने उषा यांना विषारी पावडर मिसळलेला चहा दिला. उषा यांनी चहा प्याल्यानंतर […]

अधिक वाचा..

सततच्या छळाला कंटाळून महिलेने मुलाच्या मदतीने प्रियकराचा खून केला; चाकणमधील थरारक हत्याकांडाचा उलगडा

पुणे: पुण्यातील चाकण परिसरातून एक धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने थेट आपल्या मुलाच्या मदतीने प्रियकराचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत तिन्ही आरोपींना अटक केली असून, भरवस्तीत घडलेली ही हत्या आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी रचलेला […]

अधिक वाचा..

आईच्या उपचारासाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलानेच केली आयकर अधिकारी वडिलांची निर्घृण हत्या

लातूर: “आईला दवाखान्यात नेण्यासाठी पैसे का देत नाहीत? आमचा सांभाळ का करत नाहीत?” असा जाब विचारत पोटच्याच २९ वर्षीय मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी खोपेगाव (ता. लातूर) येथे घडली. या प्रकरणी लातूर ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुलाला अटक करण्यात आली आहे. खोपेगाव […]

अधिक वाचा..

निवडणुकीच्या चर्चेतून रक्तरंजित कृत्य? सात वर्षांच्या लेकीची कॅनलमध्ये फेकून हत्या

नांदेड: एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या चिमुकलीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, या घटनेने नांदेड जिल्ह्यासह संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. मुखेड तालुक्यातील केरूर गावातील रहिवासी पांडुरंग कोंडामंगले (वय ३२) याने आपल्या मुलीला तेलंगणा राज्यात नेऊन कॅनलमध्ये फेकून दिल्याची माहिती उघडकीस आली आहे. या प्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आरोपी पित्याला ताब्यात घेऊन […]

अधिक वाचा..

लोकलमधील किरकोळ वादातून प्रवाशाचा खून; मालाड रेल्वे स्थानकावर थरार

मुंबई: मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी आता जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गर्दीमधून होणारे वाद, धक्काबुक्की ही बाब नवी नाही; मात्र याच वादातून एका प्रवाशाचा खून झाल्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकावरील […]

अधिक वाचा..

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचा खून; आरोपी २ तासांत पोलिसांच्या ताब्यात

शिरूर डीबी पथक व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, केवळ दोन तासांच्या आत आरोपींना शिरूर डीबी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिरूर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

दारू पाजण्याच्या वादातून वडगाव रासाईत मित्राचा खून

शिरूर (अरुणकुमार मोटे): वडगाव रासाई (ता. शिरूर) येथे दि.१६ रोजी रात्री उशिरा दारू पाजण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. फिर्यादी वंदना अविनाश उर्फ विशाल जावीर (वय ३५), व्यवसाय – शेतमजुरी, रा. मराठी शाळेच्या पाठीमागे, वडगावरासाई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पती अविनाश […]

अधिक वाचा..