रांजणगाव पोलिसांनी खुन झालेल्या मयताची ओळख पटवत 12 तासाच्या आत आरोपीना ठोकल्या बेड्या

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील एक्सप्रो इंडीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तसेच डंकन कंपनीकडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला असलेल्या मोकळ्या माळरानामध्ये एका 25 ते 30 वयोगटातील अनोळखी पुरुषाचा डोक्यात दगड घालून खुन करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल हेमंत इनामे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरुवार (दि.01) रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

१) तत्त्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर २) व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी ३) रास्तगोफ्तार – दादाभाई नौरोजी ४) न्यू इंडिया – बिपिनचंद्र पाल ५) न्यू इंडिया – अ‍ॅनी बेझंट ६) यंग इंडिया – महात्मा गांधी ७) इंडियन मिरर – डी. डी. सेन ८) द ईस्ट इंडियन – हेन्री डेरोझियो ९) इंडियन ओपिनियन – महात्मा […]

अधिक वाचा..

सेवाधामला एक मूठ धान्य उपक्रमातून तीनशे किलो धान्य भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसाठी चाकण येथील विद्या व्हॅली इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थी व शिक्षकांनी एक मूठ धान्य उपक्रम राबवून या उपक्रमाच्या माध्यमातून तीनशे किलो धान्य सेवाधाम विद्यालयास सुपूर्द केले. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम मतिमंद निवासी विद्यालयातील विशेष विद्यार्थ्यांसाठी विद्याव्हॅली इंटरनॅशनल स्कूलच्या सेक्रेटरी रोहिणी […]

अधिक वाचा..

‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले […]

अधिक वाचा..
crime

कोंढापुरीत हॉटेल कामगाराचे मालकाच्या दुचाकीसह ऐवज लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील हॉटेल मालक हॉटेल साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेलेला असताना हॉटेल कामगाराने मालकाच्या दुचाकीसह हॉटेल मधील रक्कम घरातील मोबाईल तसेच इतर साहित्य घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल कामगार गणेश राधाकिसन जिगे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोंढापुरी (ता. शिरुर) अविष्कार शिंदे यांचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वनविभागाकडून बिबट जनजागृती

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे पशुधनासह नागरिकांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याने शेतकरी व नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचे आवाहन शिरुर वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या माध्यमातून शिरुर तालुक्यात करण्यात येत असलेल्या जनजागृतीतून करण्यात येत आहे. शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचे नागरिकांना दर्शन होत असल्याने परिसरात उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात […]

अधिक वाचा..

पतीने स्वतःची किडणी पत्नीला देवूनही वाचवू शकले नाही

शिरुर (अरुणकुमार मोटे): आतापर्यंत तुम्ही बहीनीला, आईला, मुलाला, भावाला, किडणी दिल्याचे ऐकले असेल. परंतू चक्क आपल्या शिक्षक पत्नीला एका शिक्षकाने आपली किडणी देवून पत्नीधर्म निभावून पत्नीच्या प्रेमापोटी जीव वाचवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला होता. परंतू नियती पुढे कोणाचेही काही चालत नाही. किडणी देवूनही पत्नीचे दुखःद निधन झाल्याने शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. करडे (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..
crime

पाबळमध्ये पोलिसांत तक्रार दिल्याने युवकाला मारहाण

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांमध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल झालेल्या असताना तक्रारी मध्ये नाव का दिले असे म्हणून एका युवकाने भावकीतील एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अभिजित रघुनाथ पिंगळे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पाबळ (ता. शिरुर) येथे सोमनाथ पिंगळे व मिनिनाथ […]

अधिक वाचा..

सणसवाडीत विहिरीत पडलेल्या नागाला जीवदान

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या नागाला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले असून नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील सुनील हरगुडे यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यामध्ये मध्ये एक नाग पडला असल्याचे काही नागरिकांना दिसले त्यांनी याबाबतची माहिती इंडिया बुक रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना देताच […]

अधिक वाचा..

डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी भाविकांकडून लाखोंची मदत…

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी सर्व भाविकांनी एकत्रित येत तब्बल 3 लाख रुपयांची मदत देऊ केली असल्याने गावातील मंदिराचा चांगला विकास होणार आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिर असून सदर मंदिराच्या विकासासाठी गावातील प्रत्येक व्यक्ती पुढाकार घेत असून नुकतेच मंदिराच्या पायऱ्या बनविण्याच्या कामात आणखी सुधारणा […]

अधिक वाचा..