crime

कोंढापुरीत हॉटेल कामगाराचे मालकाच्या दुचाकीसह ऐवज लांबवला

क्राईम

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथील हॉटेल मालक हॉटेल साठी लागणारे साहित्य आणण्यासाठी गेलेला असताना हॉटेल कामगाराने मालकाच्या दुचाकीसह हॉटेल मधील रक्कम घरातील मोबाईल तसेच इतर साहित्य घेऊन पोबारा केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे हॉटेल कामगार गणेश राधाकिसन जिगे याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) अविष्कार शिंदे यांचे शिंदे सरकार नावाचे हॉटेल असून तेथे गणेश जिगे हा कामगार कामाला असून अविष्कार शिंदे हे हॉटेलचे साहित्य व माल आणण्यासाठी गेलेले असताना गणेश हॉटेलवर होता सायंकाळच्या सुमारास शिंदे हॉटेल मध्ये आले असताना त्यांना गणेश तसेच हॉटेल समोर लावलेली एम एच १२ पी पी ७५८७ हि दुचाकी दिसली नाही त्यामुळे त्यांनी हॉटेलचे ड्रावर पाहिले असता ते तुटलेले दिसल्याने त्यांनी हॉटेल मागे जाऊन घराची पाहणी केली असा घरचे कुलूप तुटलेले होते.

दरम्यान घराची व हॉटेलची पाहणी केली असता कामगार गणेश हा हॉटेल मधील रोख रक्कम, घरातील मोबाईल सह आदी साहित्य आणि दुचाकी घेऊन फरार झाल्याचे दिसून आले.

याबाबत अविष्कार आकाश शिंदे (वय २२) रा. कोंढापुरी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी हॉटेल कामगार गणेश राधाकिसन जिगे रा. वडगाव कोलांटी ता. औरंगाबाद जि. औरंगाबाद याचे विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.