डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी भाविकांकडून लाखोंची मदत…

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिराच्या पायऱ्यांसाठी सर्व भाविकांनी एकत्रित येत तब्बल 3 लाख रुपयांची मदत देऊ केली असल्याने गावातील मंदिराचा चांगला विकास होणार आहे.

कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील डोंगर आई मंदिर असून सदर मंदिराच्या विकासासाठी गावातील प्रत्येक व्यक्ती पुढाकार घेत असून नुकतेच मंदिराच्या पायऱ्या बनविण्याच्या कामात आणखी सुधारणा करत दोन्ही बाजूला सहा इंची भिंत व लोखंडी दरवाजा बसवण्याचा निर्णय भाविकांनी घेतला आहे. त्यानंतर धार्मिक क्षेत्रात आवड असणाऱ्या सांगवी पुणे येथील श्रीमती विठाबाई रावसाहेब ओव्हाळ यांनी २ लाख ८१ हजार रुपये मदत कॉन्ट्रॅक्टर अभिषेक ननवरे यांच्याकडे सुपुत्र केली तर नाशिक येथील जीवनलाल हिरे यांनी देखील 11 हजार रुपयांची मदत ग्रामस्थांकडे सुपूर्त केली.

याप्रसंगी मंत्रालय कक्ष अधिकारी अजय खर्डे, माजी चेअरमन भाऊसाहेब तळोले, ग्रामपंचायत सदस्य योगेश पुंडे, विठ्ठल खर्डे, भाऊसाहेब पुंडे यांसह आदी उपस्थित होते. सदर मंदिराच्या कामाला सुरुवात देखील करण्यात आलेली असून येथील कामाला पाणी मारण्याचे तसेच देखभालीचे काम भाऊसाहेब पुंडे हे करत आहे.