मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुंबईतील दादर येथे काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है’, […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! सोनाली राऊतच्या ‘ॲटीट्यूड’वर रितेश भाऊंचा संताप, थेट नॉमिनेशनचा इशारा

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळत आहे. स्पर्धक सोनाली राऊतच्या वागणुकीमुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, शोचे होस्ट रितेश देशमुख यांनी तिला कडव्या शब्दांत सुनावलं आहे. “हा ॲटीट्यूड घरी ठेवायचा, या घरात नाही” असे स्पष्ट शब्दांत सांगत रितेश भाऊंनी शिस्त आणि मर्यादांची आठवण करून दिली.शो सुरू झाल्यापासूनच रितेश […]

अधिक वाचा..

रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भाजपचे शक्तीप्रदर्शन; हजारोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीचे रणशिंग फुंकले असून, पक्षाचे अधिकृत उमेदवार स्वाती पाचुंदकर पाटील , मनिषा पाचंगे आणि सागर देवकर यांनी भव्य आणि शिस्तबद्ध शक्तीप्रदर्शन करत सोमवार (दि १९) रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या कार्यक्रमामुळे संपूर्ण गटात भाजपची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली […]

अधिक वाचा..

INDIA कडून उपराष्ट्रपतिपदाची उमेदवारी जाहीर होताच सुदर्शन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया

मुंबई: जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिल्यानंतर येत्या ९ सप्टेंबर रोजी या पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाप्रणित एनडीएकडून (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपदीपदाचे उमेदवार म्हणून नाव जाहीर […]

अधिक वाचा..

ज्यांच्या विरोधात वीस वर्षे संघर्ष केला, त्यांच्याकडुनच उमेदवारी घेतल्याने आढळराव यांच्यावर मतदार नाराज…?

शिरुर (तेजस फडके) गेली वीस वर्षे सतत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात निवडणुक लढवली. शरद पवारांसह, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, दिलीप मोहीते पाटील यांच्यासह अनेक नेत्यांवर टिका केली. तसेच अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जरी माझ्या विरोधात उभे राहिले. तरी माझा पराभव होऊ शकत नाही अशा वलग्ना करणाऱ्या शिवाजीराव आढळराव पाटलांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नाईलाजाने राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

एम यु एच एस सिनेटसाठी डॉ. पराग संचेतींचे नामांकन वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव

पुणे (प्रतिनिधी): ऑर्थोपेडिक्स आणि पुनर्वसन क्षेत्रात नावलौकिक कमावलेले डॉ.पराग संचेती यांचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (एमयुएचएस) सिनेटसाठी गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र आणि कुलगुरू यांच्या तर्फे नामांकन करण्यात आले आहे. डॉ.संचेती यांना वैद्यकीय अध्यापनाचा तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सिनेटसाठी त्यांचे नामांकन ही त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील भरीव योगदानाची पावतीच म्हणावी लागेल. डॉ.पराग […]

अधिक वाचा..