इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

मुख्य बातम्या राजकीय

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार (दि 7) आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया आघाडी आता अतिरेकी कसाबची भाषा बोलू लागली असल्याचे म्हटले आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वडेट्टीवारांना टोला लगावला. वडेट्टीवार हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. आमची महायुती मात्र कसाबला फाशीची शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन बाजू लढविणाऱ्या उज्वल निकमांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

करकरेंचा मृत्यू कसाबच्या गोळीने नाही तर एका अधिकाऱ्याच्या गोळीने झाला असे वक्तव्य वडेट्टीवारांनी केले होते. वडेट्टीवारांच्या या वक्तव्यावर फडणवीस यांनी जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की ही देशाची निवडणूक आहे. शिरुरचा वाहतूककोंडीचा प्रश्न, पाणीप्रश्न सोडविण्यासाठी नितीन गडकरी, मी, आढळराव यांच्या समन्वयातून बैठका झालेल्या आहेत. दोन वर्षात हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यासाठी आढळराव यांना साथ देण्याचे काम तुम्हाला करायचे आहे असे आवाहन फडणवीस यांनी केले.

 

शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शिरुर येथील आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. पाच कंदील चौक येथे झालेल्या या सभेला कॅबिनेटमंत्री अनिल पाटील, आमदार महेश लांडगे, राहुल कुल, माजी आमदार पोपटराव गावडे, योगेश टिळेकर, रघुनाथ शितोळे, भाजप नेते निरंजन डावखरे, जयश्री पलांडे, आशा बुचके, भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, युवा नेते राहुल पाचर्णे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविंद्र काळे, जनता दलाचे नाथा शेवाळे, जय मल्हार क्रांती संघटनेचे दौलत शितोळे, संजय रौंधळ, राजेंद्र जासूद, शरद कालेवार, सुभाष जगताप, नितीन पाचर्णे, आदी उपस्थित होते. दरम्यान विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते गणेश कवडे यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला.

 

शिवाजीराव आढळरावांपेक्षा एक गोष्ट डॉ अमोल कोल्हे यांना चांगली जमते. आढळराव नाटकं करत नाहीत, मात्र कोल्हे एवढे नाटकी आहेत की त्यांना खोटं रडता येतं, हसता येतं, जुमलेबाजी करता येते, गोड गोड बोलता येतं पण त्याला जनता भुलणार नाही.

देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री)

 

शिरुर मतदारसंघातील खेड-सिन्नर रस्ता बायपासचे काम पूर्ण झाले आहे. शिरुरसाठी ७२ कोटींची पाणीयोजना मंजूर केली आहे. संभाजी महाराजांच्या स्मारकाचे ४०० कोटींच्या निधीतून काम मार्गी लागणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे, वाहतुकीचा आणि पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी काही हजार कोटींचा निधी लागणार आहे. या निवडणुकीनंतर शिरुरच्या चार गावांचा पाणीप्रश्न, जुन्नरच्या आणे पठाराचा पाणीप्रश्न आणि आंबेगावच्या सातगाव पठारचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यास माझा प्राधान्यक्रम असणार आहे.

शिवाजीराव आढळराव पाटील (माजी खासदार) 

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत