आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

मुख्य बातम्या राजकीय

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे शिरुर-हवेलीत एकनिष्ठ, स्वाभिमानी पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांनी आता जागृत राहून गद्दारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याची टिका शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते तथा पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी केली. . दरम्यान आढळरावांनी शिवसेनेच्या मतांवर खासदार होऊन शेवटी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी म्हणजेच बाळासाहेबांशी गद्दारी केली आहे, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही. या निवडणुकीत शिवसैनिक त्यांना कायमचे घरी पाठवणार असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

 

तसेच शिरुरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवाराचे काम करत आघाडीचा धर्म पाळून अमोल कोल्हे यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा असे अवाहनही सचिन अहिर यांनी केले आहे. वाघोली येथे शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी जिल्हा उपप्रमुख संजय सातव पाटील यांच्या अमृत पॅलेस बंगला परिसरात जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरूर-हवेली विधानसभा मतदार संघातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व महिला भगिनी, पदाधिकारी यांची बैठक पार पडली.

 

या बैठकीला संजय सातव पाटील, सल्लागार राजेंद्र पायगुडे, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सहसचिव विशाल सातव पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख युवराज दळवी, वाघोली शहरप्रमुख दत्तात्रय बेंडावले, महिला आघाडीच्या माजी तालुका संघटक सविता कांचन, पंचायत समितीचे माजी सदस्य काळुराम मेमाणे, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा समन्वयक अलका सोनवणे, ओंकार तुपे ,तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाचे शिरूर- हवेलीतील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीचे आयोजन माजी नियोजन समिती सदस्य शिवसेनेचे नेते संजय सातव पाटील यांनी केले होते.

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत