मातृत्व काळं ठरलं! २ महिन्यांच्या चिमुकल्याला जिवंत जाळत आई बनली यमदूत

हैद्राबाद: हैदराबादमधील बोवरामपेट परिसरात आईनेच आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्याला जळत्या चुलीत फेकून ठार केल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पित्याने पाहिला थरकाप उडवणारा प्रसंग मिळालेल्या माहितीनुसार, बाळाचा पिता राजेंद्र सकाळी कामावरून घरी परतला असता त्याने पत्नी ममता हिला स्वतःच्या बाळाला चुलीतील […]

अधिक वाचा..

राजे यशवंतराव होळकर निवासी शाळांवरून बहुजन कल्याण विभागात वाद; सचिवांचा आदेश धाब्यावर?

मुंबई: धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बहुजन कल्याण विकास विभाग अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शिक्षण योजना संदर्भात मोठा प्रशासकीय वाद निर्माण झाला आहे. सचिवांनी २५ निवासी शाळांची मान्यता नाकारत कठोर आदेश दिल्यानंतरही विभागाच्या संचालकांकडून पुन्हा गुणवत्ता तपासणीचे आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. २५ शाळांवर निधी […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

सुनेत्रा पवार यांच्या गाडीचे स्टेअरिंग अनिकेत तटकरे यांच्या हाती, प्रोटोकॉलवर प्रश्नचिन्ह

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. अजित पवार यांच्या निधनानंतर […]

अधिक वाचा..

मेट्रो स्लॅब दुर्घटनेवरून राजकारण तापले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: वडाळा–कासारवडवली मुंबई मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या कामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी! चोरीच्या आरोपांवरून घरात रणकंदन; तन्वीचा शो सोडण्याचा इशारा तर…

मुंबई: ‘बिग बॉस मराठी ६’च्या आजच्या भागात घरात पुन्हा एकदा सामान चोरीचा मुद्दा चांगलाच पेटला. दीपालीने सामानाबाबत विचारणा केल्यानंतर विशाल आणि रोशन यांनी प्रभूचा कप्पा तपासला. या कप्प्यातून तांदूळ, पीठ आणि इतर साहित्य सापडल्याने घरात खळबळ उडाली. हे सामान कोणी लपवलं? हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरला. अनुश्रीने तन्वी आणि रुचिता यांच्यावर संशय व्यक्त केला. राकेशने […]

अधिक वाचा..

उमेदरीवरून राजकीय उलथापालथ! काळे गटाचा भाजमध्ये प्रवेश; भाजप–राष्ट्रवादी थेट आमनेसामने

पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे, समाधान काळे व गणेश पाटील यांनी समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. उमेदवारीवरून राष्ट्रवादीत झालेल्या कोंडीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून समाधान काळे यांच्या पत्नी मोनिका काळे यांना वाखरी तर गणेश पाटील […]

अधिक वाचा..

प्रयागराजमध्ये माघ मेळ्यावरून वाद पेटला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, आंदोलन तीव्र

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील मतभेद आता थेट आंदोलन आणि कायदेशीर नोटीशीपर्यंत पोहोचले आहेत. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानस्थळी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी […]

अधिक वाचा..
trupti-sarode

शिरुर ग्रामीण-न्हावरे गटात उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ कायम; राष्ट्रवादीच्या तृप्ती सरोदे मात्र ‘प्रचारात’ आघाडीवर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर ऐन थंडीतही राजकीय वातावरण तापू लागले असले, तरी अद्याप कोणत्याही प्रमुख पक्षाकडून अधिकृत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. भाजप, काँग्रेस तसेच दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेनेकडून सध्या फक्त ‘चाचपणी’ सुरु असून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होत असली, तरी उमेदवारीचा ‘सस्पेन्स’ […]

अधिक वाचा..

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

शिरुर (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या गावांची पाणी प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार…? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न, या प्रश्नावर परस्पर नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत. […]

अधिक वाचा..