ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या गावांची पाणी प्रश्न सोडविण्याची गॅरंटी कोणता नेता घेणार…? असा सवाल लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून केला जात आहे. प्रत्येक निवडणुकीत तालुक्यातील बारा गावांचा पाणी प्रश्न, या प्रश्नावर परस्पर नेत्यांनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. लोकप्रतिनिधींकडून पाणी प्रश्न तडीस नेण्याच्या वल्गना केल्या आहेत.

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडू लागला आहे. एकीकडे उन्हाने रान तापले असताना दुसरीकडे आरोप प्रत्यारोपाने वातावरण गरम होऊ लागले आहे. पुढाऱ्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती वेगवेगळ्या स्त्रोतामार्फत लोकांपर्यंत पोचविण्याचे काम जोमात सुरु आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तालुक्यातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधींचा आलेल्या निधीतून तालुक्यातील रस्ते, सभामंडप, सामाजिक इमारती, बंधारे, नाले यांसारखी अनेक विकासकामे यातून मार्गी लागली आहेत. कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद, हि गावे रांजणगाव गटात जिल्हा परिषद व पंचायत समती साठी येत असून येथे अनेक दिग्गज नेते जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी रिंगणात आहेत.

परंतु पाणी प्रश्नावर एकाही उमेदवाराने भाष्य केलेले नाही. कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद या तीन गावातील जनता पाणी प्रश्नावर ठाम असून,जो उमेदवार पाण्यासाठी लढेल त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू अशी भूमिका या गावातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे पाण्याचा गंभीर प्रश्नावर आक्रमक झालेली तीन गावातील जनता कोणाला कौल देणार यावर सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

ज्योती मानसिंग पाचुंदकर यांना प्रचारात पतीची खंबीर साथ!