संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा संपला असला तरी सरकार आणि विरोधकांमधील कोंडी अद्याप कायम आहे. केंद्र सरकारने या काळात काही महत्त्वाची विधेयके मंजूर करून घेतली असली, तरी आता अधिवेशनाच्या अखेरच्या आठवड्यात सीमांकन (Delimitation), महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती आणि परकीय निधी नियमन कायदा (FCRA) दुरुस्ती विधेयकांवरून […]

अधिक वाचा..

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली: जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मात्र, आंदोलन संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या आडून काँग्रेस आणि विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य […]

अधिक वाचा..

बहुमत नव्हे, उत्तरदायित्वच लोकशाहीची खरी ताकद! संसदेत सरकारने जनतेला जाब द्यायलाच हवा

मुंबई: भारतीय लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणजे संसद. ती केवळ कायदे मंजूर करणारी संस्था नाही, तर जनतेच्या सार्वभौम इच्छेचे प्रतिनिधित्व करणारे सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे. सरकारच्या निर्णयांची छाननी, राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा, सत्ताधारी आणि विरोधकांमधील संवाद आणि शासनाला उत्तरदायी धरण्याची प्रक्रिया संसदेतूनच घडते. त्यामुळे संसदेत चर्चा होणे आणि सरकारने जनतेच्या प्रतिनिधींसमोर आपल्या निर्णयांचा हिशेब देणे, ही […]

अधिक वाचा..

सिंचन घोटाळ्याची फाईल आणि रहस्यमय मृत्यू! अजित पवारांच्या मृत्यूवर संसदेत संशयाचा बॉम्ब

नवी दिल्ली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत संशय व्यक्त करत हा मुद्दा थेट संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला. इतक्या तडफदार आणि दमदार नेत्याचा अकाली मृत्यू होणं ही अत्यंत धक्कादायक व दुर्दैवी बाब असल्याचं राऊत यांनी सांगितलं. राज्यसभेतील भाषणात संजय राऊत म्हणाले, “मला अजित पवारांची आठवण […]

अधिक वाचा..

संसदेच्या इतिहासात प्रथमच सेवानिवृत्त शिक्षकांना खासदार लंके यांनी घडविले संसद दर्शन

शिक्षकांनी घेतला थेट अधिवेशनाचा अनुभव पारनेर: शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असतो. आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांच्या मनावर सातत्याने संस्कार करणा-या शिक्षकांचा गौरव करणे हे समाजाचे कर्तव्य आहे. हेच भान ठेवत खासदार नीलेश लंके यांनी एक विलक्षण आणि अभूतपूर्व उपक्रम राबवत दोऩशे हून २०० सेवानिवृत्त शिक्षकांसाठी संसदेच्या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते.   त्यावेळी शिक्षकांना ख-या अर्ताने […]

अधिक वाचा..

विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून रोजी संसद आणि राज्यांच्या अंदाज समित्यांची राष्ट्रीय परिषद

अर्थसंकल्पीय अंदाजांचे पुनर्विलोकन आणि प्रभावी नियंत्रण यासाठी अंदाज समितीची भूमिका… मुंबई: भारताच्या संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला 75 वर्षे पूर्ण होत असून या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधान भवन, मुंबई येथे 23 व 24 जून, 2025 रोजी या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून लोकसभा अध्यक्ष […]

अधिक वाचा..

लंडनच्या संसद चौकात “जय शिवराय” चा जयघोष अँड संग्राम शेवाळे यांच्या पुढाकारातून शिवजयंती साजरी…

शिरुर (तेजस फडके): हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. परंतु लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी आपला मराठी बाणा जपत त्यांच्या मित्र परिवारासोबत लंडन शहर संसद चौकात भारतीय विद्यार्थी व इतर देशातील विद्यार्थ्यांसोबत मिळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी सर्व विद्यार्थांनी “छत्रपती शिवाजी महाराज की […]

अधिक वाचा..