राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल…

औरंगाबाद: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. तर *महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना […]

अधिक वाचा..

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षांच्या सुचनेनुसारच…

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या सुचनेनुसारच घेतला होता. आघाडीचा धर्म पाळत मित्रपक्षाच्या निर्णयाचा शिवसेनेने मान राखायला हवा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी स्पष्ट […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये लोकप्रतिनीधीही असुरक्षित…

काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करणा-यांना तातडीने अटक करा मुंबई: काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर केलेला हल्ला हा महाराष्ट्रात गुन्हेगारांचे मनोबल वाढल्याचे उदाहरण आहे. शिंदे फडणवीस सरकारमध्ये गुन्हेगारी वाढली असून लोकप्रतिनीधीवर हल्ले होत असतील तर हे गंभीर असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पोलीस दलावर वचक नसल्याचे दिसत आहे. शिंदे-फडणवीसांच्या राज्यात लोकप्रतिनीधीही सुरक्षित […]

अधिक वाचा..

गृहमंत्र्याला जाब कोण विचारणार?

मुंबई: निषेध, आंदोलने, पत्रके यांना धार तेव्हाच येईल, जेव्हा माध्यमात शिंदे-फडणवीस यांना बहिष्कृत केले जाईल. उठसूठ फालतू विषयावर ट्विट करणाऱ्या प्येमचे या विषयावर काहीही ट्वीट नाही. गृहमंत्र्याला घेराव घालण्याचे आंदोलन हवे. कायदा-सुव्यवस्थेची राज्यात वाट लागली आहे. भाजपशी संबंधित वार्ताहर हे खासगी भानगडीत पत्रकार संरक्षण अधिनियमांतर्गत गैरवापर करुन नको ते गुन्हे दाखल करुन घेत आहेत. गृह […]

अधिक वाचा..

जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी…

दिल्ली: पेन्शनर्ससाठी जीएसटी कौन्सिलच्या धर्तीवर केंद्र व राज्यांनी एकत्र येऊन एक कौन्सिल तयार करावी. या परिषदेच्या माध्यमातून एक निश्चित अशी प्रणाली तयार करता येणे शक्य होईल अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सभागृहात केली. दरम्यान काही राज्यांनी जुनी पेन्शन स्कीम सुरु केली असल्याची आठवणही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी यानिमित्ताने सरकारला करुन दिली. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील खैरेवाडी येथील उपसरपंच तसेच एक सदस्य अपात्र 

शिरुर (तेजस फडके): सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या उपसरपंच तसेच एका सदस्यास पुणे विभागीय आयुक्तांनी दणका दिला असुन ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर प्रभू मांदळे आणि उपसरपंच नंदकिशोर काळूराम गोडसे यांना सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी अतिरिक्त विभागीय आयुक्त यांनी दि 2 फेब्रुवारी 2023 रोजीच्या आदेशान्वये अपात्र ठरवले आहे. यापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी दिलेला निकाल विरुद्ध सदरचे आपिल दाखल […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्याचे राजकारण नवीन वळण तर घेणार नाही ना?

राष्ट्रवादीच्या आबाराजे मांढरेंच्या कार्यक्रमाला प्रदीप कंदांची उपस्थिती शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरुवात करणारे बाजार समितीचे संचालक आबाराजे मांढरे यांच्या पत्नी कुसुम मांढरे यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद तसेच तेथील एखाद्या समितीचे सभापतीपद आणि स्वतः आबाराजे मांढरे यांना बाजार समितीचे सभापतीपद देऊ, असे शब्द मिळूनही 5 वर्षात काहीच न […]

अधिक वाचा..

देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राचा विकास जेवढा गतीने होतो तेवढा देशाच्या विकासाला गती मिळते. सध्या महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचेची वाटचाल १ ट्रिलियनकडे होतांना दिसत असून पुढील ४-५ वर्षात देशाची अर्थव्यवस्था ही जगात तिसऱ्या क्रमांकावर येणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘न्यूज स्टेट महाराष्ट्र- गोवा’ या मराठी वृत्त वाहिनीचा शुभारंभ फडणवीस यांचा हस्ते आज मुंबईत करण्यात आला. त्यावेळी […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारीपासून; 9 मार्चला सादर होणार अर्थसंकल्प

मुंबई: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन २०२३-२४चा अर्थसंकल्प गुरुवार, ९ मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड् राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची […]

अधिक वाचा..

त्या ग्रामपंचायतीत सदस्यांची बंडखोरी, 13 सदस्य गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल…

बीड: औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्यांची बंडखोरी पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीतील 13 सदस्य गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. जोगेश्वरी ग्रामपंचायतमध्ये 17 पैकी तब्बल 13 सदस्यांनी बंडखोरी केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायत खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्य वगळता सर्वच सदस्यांनी […]

अधिक वाचा..