बीड: औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत सदस्यांची बंडखोरी पाहायला मिळत आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीतील 13 सदस्य गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत.
जोगेश्वरी ग्रामपंचायतमध्ये 17 पैकी तब्बल 13 सदस्यांनी बंडखोरी केल्याची माहिती आहे. शिवसेनेच्या ताब्यातील ग्रामपंचायत खेचून घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. जोगेश्वरी ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे. सरपंच, उपसरपंच आणि दोन सदस्य वगळता सर्वच सदस्यांनी बंडखोरी केली आहे. या सदस्यांनी भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. आधी हे सदस्य पिकनिकला गेले. पर्यटन झाल्यावर त्यांना एका हॉटेलात नजरकैदेत ठेवण्यात आलं.
सरपंच आणि उपसरपंचाकडून बंडखोर सदस्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील भोंडवे पॅलेसमध्ये बंडखोर सदस्यांचा मुक्काम आहे. दोन दिवसांत जोगेश्वरी ग्रामपंचायतीत अविश्वास ठराव मांडला जाणार आहे.
अविश्वास ठराव मांडणार
दरम्यान, आम्ही येत्या दोन दिवसात सरपंच आणि उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव मांडणार आहोत. आमच्यावर अन्याय झाला आहे. सरपंच आणि उपसरपंच काहीच कामे करत नाहीत. विकास कामे होत नाहीत. विकासकामेच होत नसल्याने मतदार आमच्यावर नाराज आहेत. त्यामुळेच आम्ही अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे, असं एका सदस्याने सांगितलं.