मोदींचा फोटो असावा, पण शिवरायांच्या रांगेत नको; अमित ठाकरे प्रकरणावर राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अखेर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात अमित ठाकरे यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांची भेट घेतली होती. यावेळी प्राध्यापकांच्या कार्यालयातील भिंतीवर […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे विकासाच्या रोडमॅपने उत्तर

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा रोडमॅप समोर ठेवत प्रत्युत्तर दिले आहे. नवीन विमानतळ, एरो सिटी, मेडिसिटी आणि मोठ्या प्रमाणावरील ग्रोथ हबच्या माध्यमातून तिसरी मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे विकासकेंद्र बनवण्याचे नियोजन असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार! राज ठाकरेंच्या भावनिक विधानांनंतर राजकीय चर्चांना उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे घराण्याच्या एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा राजकीयदृष्ट्या जवळ येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याबाबत 20 वर्षांनंतर व्यक्त केलेली भावना आणि अलीकडील काही घडामोडी या […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंचा इशारा आणि काही तासातच त्या लेडीज बार वर तुफान हल्ला..

पनवेल: शनिवारी शेकापच्या वर्धापनदिन सोहळ्यात पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी असणाऱ्या रायगड जिल्ह्यात अनधिकृत डान्सबारांच्या वाढत्या संख्येवर जोरदार टीका केली होती. रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला जिल्हा. महाराजांचा राज्यकारभार ज्या किल्ल्यांवरून चालला त्या किल्ल्यावरून या जिल्ह्याला नाव पडले. असे असताना रायगडची ओळख आता डान्सबारचा जिल्हा अशी […]

अधिक वाचा..

राज ठाकरेंचे खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र

मुंबई: मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिलं आहे. भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरल्यामुळे ठाकरेंनी हे पत्र लिहिले आहे. लोकसभेच्या अधिवेशनादरम्यान महाराष्ट्रातील खासदारांनी भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांना घेरलं होतं. तसेच दुबे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून त्यांचे कौतुक […]

अधिक वाचा..