‘रांजणगाव मॅरेथॉन’ च्या बुकिंगसाठी उरले फक्त आठ दिवस

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात ‘रांजणगाव मॅरेथॉन’ ने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच या स्पर्धेत दरवर्षी हजारो स्पर्धक सहभागी होऊन आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश देतात. यावर्षीही या स्पर्धेची जय्यत तयारी सुरु असून या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आता फक्त आठ दिवसांची मुदत राहिली असुन जास्तीत जास्त स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिस ठाण्यातील दोघांची सहायक फौजदार तर तिघांची हवालदारपदी पदोन्नती

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पोलीस दलातील पोलिसांच्या सेवा कार्यकाळानुसार बढती झालेली असताना पुणे ग्रामीण पोलीस दलातील तब्बल चौतीस जणांची पोलीस नाईक पदाहून पोलीस हवालदार पदावर बढती झालेली आहे. रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस हवालदार संजीव दाजीराम गायकवाड आणि गुलाब शिवराम येळे यांची सहायक फौजदारपदी बढती झाली. तर पोलिस नाईक म्हणुन कार्यरत असलेले माणिक […]

अधिक वाचा..

मानव विकास परिषदेच्या वतीने रांजणगाव मध्ये संविधान दिनानिमित्त MPSC च्या विद्यार्थ्यांचा सत्कार

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथे संविधान दिनाचे औचित्य साधुन मानव विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिरुर तालुक्यातील MPSC परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. 11 विद्यार्थ्यांची विक्रीकर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून निवड झाल्याने मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मानव […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांचा बेशिस्त वाहनचालकांना दणका अवघ्या ९ महिन्यात ८४ लाखांचा दंड वसूल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या वाहतूक विभागानं मोठा दणका दिला आहे. बेशिस्त वाहनचालकांकडून अवघ्या नऊ महिन्यात पोलिसांनी तब्बल ८४ लाखांचा दंड वसूल केला आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी ही माहिती दिली. वाहन चालकांच्या स्वयंशिस्तीच्या अभावामुळे दिवसेंदिवस वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक नियमांचे उल्लंघन […]

अधिक वाचा..

नक्की काय आहे रांजणगाव गणपतीचा इतिहास…?

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात रांजणगाव इथं गणपतीचे मंदिर असून हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक मंदिर आहे.अष्टविनायकातील चौथा गणपती म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. रांजणगावचे श्री महागणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मुख्य रस्त्यावर उजवीकडे आहे. दक्षिणायन आणि उत्तरायण यांचा मध्य काळात सूर्याचे किरण मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण बांधणी केली आहे. मूळ मूर्तीला “महोत्कट’ […]

अधिक वाचा..