शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

मुख्य बातम्या राजकीय

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असुन मतदानाला दहा दिवस शिल्लक आहेत. असे असतानाही शिरुर तालुक्यात निवडणुकीबाबत उत्साह दिसत नाही. प्रचारासाठी बराच कालावधी दोन्ही उमेदवारांना मिळाला असला तरी कार्यकर्ते व मतदारांमध्ये उत्साह नाही. त्याचे एक कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका न होणे हे होय अशी चर्चा गावातील पुढारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे.

 

शिरुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका तसेच शिरुर नगरपालिकेच्या निवडणुका या दोन वर्षापासून प्रलंबित आहेत. या निवडणुका आज होतील, उद्या होतील यावर इच्छुक तग धरून होते. मात्र दोन वर्षांनंतर सुद्धा निवडणुका न होता. लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. परीणामी स्थानिक नेते व कार्यकर्ते यांना कोठेच संधी मिळाली नसल्याने ते लोकसभा निवडणुकीबाबत अनुत्साही दिसत आहेत. ग्रामीण भागाचा आत्मा असलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद या संस्थांच्या निवडणुका न झाल्याने कार्यकर्ते प्रचंड नाराज असुन निवडणुकीत हिरहिरीने भाग घेताना दिसत नाहीत.

 

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे माजी पदाधिकारी सुद्धा काही अपवाद वगळता या निवडणुकीपासुन लांब गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे. शिरुर तालुक्यामध्ये गावोगावी हीच परिस्थिती असून आजी-माजी पदाधिकारी कुठल्याही प्रचार फेरीत दिसत नाहीत. त्यातच राज्यातील कुठल्याच मोठ्या नेत्याची सभा न झाल्याने निवडणुकीचे वातावरण तयार होण्यास अजून देखील वेळ लागणार आहे.

 

सर्वपक्षीय पदाधिकारी संभ्रमात…

राज्यात होत असलेल्या सर्वच पक्षातील फाटाफुटीमुळे कोण कुठल्या पक्षात जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकारी संभ्रमात असून आपण कशाला वाईटपणा घ्यायचा. उद्या ते एकत्र होतील अशीच चर्चा सगळीकडे रंगताना दिसत आहे.

ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत