मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी निकालातील घोटाळ्यावर सत्यजीत तांबे आक्रमक

29 विद्यार्थ्यांना शून्य गुण देणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षांच्या एलएलबी अंतिम वर्षाच्या निकालात संपूर्ण उत्तरपत्रिका लिहूनही तब्बल २९ विद्यार्थ्यांना शून्य गुण देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुनर्तपासणीनंतर हेच विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याने उत्तरपत्रिका तपासणीतील गंभीर निष्काळजीपणा उघड झाला आहे. या प्रकरणावर आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत […]

अधिक वाचा..

राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करा; आयुष्मान योजनेचा विस्तार करा; सत्यजीत तांबे

मुंबई: राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि खासगी रुग्णालयांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याची मागणी विधानपरिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेदरम्यान केली. तांबे यांनी सांगितले की, शासकीय रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता, औषधांचा […]

अधिक वाचा..

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे. तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक […]

अधिक वाचा..

आ. सत्यजित तांबेंकडून प्रविण दरेकरांच्या स्वयं पुनर्विकास योजनेचे सभागृहात कौतुक

मुंबई: भाजपा गटनेते व मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांच्या संकल्पनेतून सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी विना विकासक ‘स्वयं पुनर्विकास’ योजना उदयास आली. मुंबईत या योजनेने गती घेतली असून सहकार क्षेत्रात ही योजना लोकप्रिय ठरली आहे. आज याचा प्रत्यय विधानपरिषदेच्या सभागृहात दिसून आले. आमदार सत्यजित तांबे यांनी या योजनेचे आणि आ. प्रविण दरेकर यांच्या कामाचे भर […]

अधिक वाचा..