प्रयागराजमध्ये माघ मेळ्यावरून वाद पेटला; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना नोटीस, आंदोलन तीव्र

प्रयागराज: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी स्नानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ज्योतिष पीठ बद्रीनाथचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यातील मतभेद आता थेट आंदोलन आणि कायदेशीर नोटीशीपर्यंत पोहोचले आहेत. माघ मेळा प्रशासनाने शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना स्नानस्थळी पालखीतून जाण्यास मज्जाव केला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी […]

अधिक वाचा..

न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही; डॉ. गोऱ्हे; सक्षम सरकारी वकील उपलब्ध करून देण्याचे आश्वासन

डॉ. गौरी पालवे–गर्जे आत्महत्या प्रकरणी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कुटुंबीयांची घेतली भेट; आरोपींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश बीड: बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आज विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्व. डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायाबाबतच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, […]

अधिक वाचा..

राज्य कर्जबाजारी झालं असताना चांदीच्या ताटात जेवणावळी का झोडल्या जात आहेत

राज्यात महिला पोलिसच सुरक्षित नसतील आणि तेही भाजप पदाधिकारी विनयभंग करत असतील तर कायदा आणि सुव्यवस्था उरली का? नागपूर: राज्य एकीकडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असताना मुंबईत अंदाज समितीच्या सदस्यांना चांदीच्या ताटातून जेवण दिले जाते. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाला असताना चांदीच्या ताटात जेवणावळी झोडण्याची आवश्यकता होती का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला […]

अधिक वाचा..

भारतीय सैन्यदलात २४ वर्षे सेवा करणारे भोयरे पठार गावचे नायब सुभेदार संतोष आंबेकर यांचा गौरव

शिरुर (तेजस फडके) भारतीय सैन्य दलामध्ये तब्बल दोन तप म्हणजेच २४ वर्षे सेवा करुन नायब सुभेदार (एम.ए.सी.पी.) या पदावरती मॅकॅनाईज इंन्फंट्री, अहिल्यानगर येथुन सेवानिवृत्त झालेले भोयरे पठार गावचे सुपुत्र संतोष सुर्यभान आंबेकर यांचा त्यांच्या मुळगावी भोयरे पठार/खुर्द, ता.जि.अहिल्यानगर येथे ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेकर कुटुंबियांसोबत त्यांचे नातेवाईक तसेच […]

अधिक वाचा..

‘स्वच्छता मॉनिटर्स’नी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले; दीपक केसरकर

मुंबई: ‘लेट्स चेंज’ प्रकल्पांतर्गत ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य देशालाही दिशा दाखवेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा विकासदेखील आवश्यक असतो, या उपक्रमाच्या माध्यमातून तो साध्य होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. मिशन स्वच्छ भारत या योजनेअंतर्गत महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने […]

अधिक वाचा..