युवकाच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

शिरुर (अरुणकुमार मोटे) कवठे येमाई (ता.शिरुर) येथील रहिवासी रमेश विठ्ठल गावडे यांचा १७ वर्षाचा एकुलता एक मुलगा कृष्णा हा हृदयाच्या आजाराने ग्रस्त असुन त्याची नारायना हॉस्पीटल बेंगलोर येथे शस्त्रक्रिया होणार आहे. यासाठी सहा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या रुग्णाच्या वडिलांची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची असुन ते स्वतः मुत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. तसेच त्यांच्या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील सणसवाडीत घरातून गेलेला इसम बेपत्ता

शिक्रापुर (शेरखान शेख) सणसवाडी (ता. शिरुर) येथे राहणारा तिरुपती अन्नकाडे या इसम बाहेर जाऊन येतो असे म्हणून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे इसम बेपत्ता झाल्याबाबतची खबर देण्यात आली आहे. सणसवाडी येथील तिरुपती अन्नकाडे हा इसम सकाळच्या सुमरास मी बाहेर जाऊन येतो असे पत्नीला सांगून गेला. त्यांनतर दिवसभर तो घरीच आला […]

अधिक वाचा..

तर्डोबाचीवाडी येथील सय्यदलाल शेख यांचे निधन

शिरुर: येथील आरोग्य विभागातील सेंटर दवाखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी सय्यदलाल आमिर शेख वय ७३ यांचे आज (दि १०) रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. व्यावसायिक दिलिप शेख, भाजपाचे अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष राजू शेख आणि व्यवसायिक हमीद शेख यांचे ते वडिल होत.

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात ॲमेझॉनच्या पार्सलचे लाखो रुपये घेऊन कामगार फरार

शिक्रापुर (शेरखान शेख) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील ॲमेझॉनच्या ऑफिस मध्ये कामाला असलेला कामगार ॲमेझॉनच्या वस्तूंचे 3 लाख 63 हजार रुपये घेऊन फरार झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विलास रमेश सुरडकर या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर येथील मलठण फाटा येथे ॲमेझॉन कंपनीच्या वस्तूंचे पार्सल नागरिकांना पुरवणारे ऑफिस असून सदर ठिकाणी […]

अधिक वाचा..

बेट भागातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याची दिपीका भालेराव यांची मागणी

कारवाई न झाल्यास 17 डिसेंबर पासुन आमरण उपोषणचा इशारा  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे, मलठण तसेच आसपासच्या गावांमध्ये हॉटेल व इतर ठिकाणी तसेच शाळांच्या आसपासच्या परीसरात मोठया प्रमाणात दारुविक्री, मटका, जुगार असे अवैध व्यवसाय चालु असुन या अवैध व्यावसायिकांना सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकवेळा समज देऊन हे धंदे बंद करण्यासाठी […]

अधिक वाचा..

कवठे येमाई येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने तरसाचा मृत्यू

शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरुर) येथील मुंजाळवाडीमध्ये कवठे येमाई – शिरूर या अष्टविनायक रस्त्यावर रस्ता ओलांडत असताना रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेने अंदाजे सात वर्षीय तरसाचा मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे.याबाबत तेथील रहीवाशी सागर चौगुले यांनी वन विभागाला तात्काळ कळवले असून घटनास्थळी वनविभागाचे वनपाल गणेश पवार, वनरक्षक ऋषिकेश लाड, वनकर्मचारी हनुमंत कारकुड यांनी […]

अधिक वाचा..

लाखेवाडीतील नवीन सभामंडपाचा स्लॅबचा काही भाग कोसळला व प्लेअरचे बीम उखडले

त्वरीत काम थांबवून ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने सुरु असलेल्या सभामंडपाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे चालले असून त्याच्या प्लेअरचा बीम लगेच उखडला जात असून स्लॅबचा काही भाग कोसळल्याने त्यातील स्टील उघडे पडले आहे. या कामाला ठेकेदाराने पाणीच मारले नाही अशी तक्रार ग्रामस्थ […]

अधिक वाचा..

महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून कायदा करावा; डॉ. अमोल कोल्हे

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक वक्तव्य केले जात असून अनेक महापुरुषांचा देखील अवमान केला जात असल्याने महापुरुषांचा अवमान होऊ नये म्हणून स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत केली आहे. महाराष्ट्रामध्ये वारंवार महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य केले जात असल्याने शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी […]

अधिक वाचा..
crime

कोरेगाव भिमातील कंपनीमध्ये चोरी करणाऱ्यावर गुन्हा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) कल्याणी फोर्जिंग कंपनी मधील कंपनीचे स्पेअर पार्ट चोरुन नेणाऱ्या कामगारावर गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरी करणाऱ्या दीपनारायण रामप्रमोद तिवारी याच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी फोर्ज कंपनीमध्ये दीपनारायण तिवारी हा कामगार आहे. सदर कंपनी मधील एस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील शिवसेनेची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

शिक्रापुरातील आढावा बैठकीतून वरिष्ठ नेते मार्गदर्शनाविनाच गेले निघून शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असताना तालुक्यातील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याने मार्गदर्शनासाठी आलेले पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन न करताच बैठकीतून निघून गेल्याने चर्चेला उधान आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेत्या जयश्री पलांडे […]

अधिक वाचा..