खसखशीचं कवच खूप कठीण असतं. त्यामुळे ती दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून नंतर वाटली जाते. त्यानंतर कढईत कोरडी भाजून तिची पूड केली जाते. पाण्याबरोबर पेस्ट केली जाते. खसखशीत काही प्रमाणात ‘ई’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन, मँगनीज, मॅग्नेशिअम, तांबं, पोटॅशिअम आणि जस्त यांचं प्रमाण असतं.
खसखशीच्या आवरणातील उपलब्ध तंतूंमुळे पोट साफ होण्यास मदत होते तसंच हा तंतू कोलेस्टेरॉलमुळे निर्माण होणारी रसायनांमध्ये बंध निर्माण करतो. त्यामुळे विघातक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.आणि परिणामी हृद्यरोगाचा धोका कमी होतो.
खसखस वाटून अंगाला लावल्यास त्वचा मृदू होते.
दोन चमचे खसखस रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते.
हाडांच्या मजबुतीसाठी आणि योग्य वाढीसाठी खसखस खाणे फायदेशीर ठरते.
खसखस च्या नियमित सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
निद्रानाशावरही खसखशीचा काढा घेतल्यास उपयुक्त ठरतो. खूप जुलाब होत असल्यास खसखशीच्या बिया वाटून त्याची लापशी किंचित जायफळ व सुंठ चूर्ण मिसळून घ्यावी.
खूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळय़ात खसखस लापशी जरुर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा.
हाय ब्लड प्रेशर आणि रक्ताल्पता दुधातून खसखस घेतल्याने दूर होते.
श्वसनासंबंधी विकारांवर दुधातून खसखस घेतल्यास त्वरित आराम पडतो.
(सोशल मीडियावरुन साभार)