Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तुमच्या आरोग्यात आणि मानसिक स्थितीत बरीच सुधारणा होईल. ती सर्व कौशल्ये, जी तुम्हाला माहीत आहेत, काहीतरी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहेत. फायद्याची बाब अशी आहे की ते स्वतःच्या वेळेवर होईल. वृषभ: तुमच्या दूरदृष्टीचा तुमच्या कामावर परिणाम होत आहे. इतर लोक देखील उपजीविकेच्या क्षेत्रातील तुमचा अनुभव जाणून घेत आहेत. तुम्हाला प्रतिस्पर्धी कंपनीकडून कॉल देखील येऊ शकतो. […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांनी हंसाप्रमाणे दृष्टी ठेवावी; तुकाराम शिरसाट

शिक्रापूर (शेरखान शेख): प्रत्येक विद्यार्थ्यांकडे हंसा प्रमाणे उत्कृष्ट शोधण्याची दृष्टी असायला हवी. ती विकसीत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयात अडकून न पडता वाचनीय पुस्तके वाचावीत तसेच आत्ताच्या सोशल मीडियाच्या मोहजालात न अडकता ग्रंथालयाशी मैत्री करून सातत्याने नवनवीन पुस्तके वाचून हंसाप्रमाणे दृष्टी ठेवावी, असे मत प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी व्यक्त केले. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव […]

अधिक वाचा..

हिवरे कुंभार मध्ये ओढा फुटल्याने शेतकऱ्याचे नुकसान

शिक्रापूर (शेरखान शेख): हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील शासकीय ओढ्याला पावसाच्या पाण्याने पूर आल्याने ओढा फुटून पाणी शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतातील सोयाबीन सह पेरुच्या बागेचे मोठे नुकसान झाल्याने शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. हिवरे कुंभार (ता. शिरुर) सह परिसरात 2 दिवस पाऊस झाल्याने परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आला आहे. परिसरात अनेक ठिकाणी […]

अधिक वाचा..

बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सचिन जोरीच्या कुटुंबाची वन विभागाकडून होतेय अवहेलना…?

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता.शिरुर) येथील सचिन बाळू जोरी (वय ३८) या तरुणाचा दीड महीन्यांपुर्वी बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह ऊसाच्या शेतात आढळून आला होता. सदर ठिकाणी बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्या होत्या. 4 ते 5 दिवसानंतर त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या मृतदेह अर्धे खाललेले व कुजलेल्या अवस्थेतील शरीर, डोक्याची कवटी व […]

अधिक वाचा..

करंदीत पुन्हा धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

शिक्रापुर (शेरखान शेख) करंदी (ता. शिरुर) येथे वारंवार बिबट्याचे जनावरांवर हल्ले तसेच नागरिकांना दर्शन होत होते. यापूर्वी एक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला होता. तर एका बिबट्याचा मृत्यू झालेला असताना आज पुन्हा एका बिबट्याला जेरबंद करण्यात शिरुर वनविभागाच्या पथकाला यश आले आहे. करंदी येथे वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांनी येथे पिंजरा लावण्याची मागणी केली होती. […]

अधिक वाचा..

लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केल्याने युवती गरोदर, आरोपीस अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे राहणाऱ्या एका मुलीशी ओळख करुन, मैत्री करुन प्रेमसंबंध प्रस्तापित करत लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करत मुलगी गरोदर राहिल्यानंतर मित्राच्या मदतीने तिचा गर्भपात करण्यासाठी तिला परावृत्त करुन तसेच लग्न न करताच पळुन गेल्याने रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात संबंधित पिडीत युवतीने फिर्याद दाखल केल्याने 1) चेतन जालींदर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात चोरट्यांचा मोर्चा आता शेतमालकडे, वखारीतून कांद्याची चोरी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील घरफोडी, कृषी पंप चोरी, केबल चोरी तसेच कृषीची दुकाने फुटलेली असून या गुन्ह्यांचा तपास लागत नाही तोच आता टेमकर वस्ती येथील शेतकऱ्याच्या वखारीतून कांद्याची चोरी झाल्याने शेतकरी वर्गात असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाली आहे. टेमकर वस्तीतील म्हसेफाटा येथे चारीच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या सुरेश लोखंडे यांच्या वखारीतून रात्रीचे […]

अधिक वाचा..

व्यक्तिमत्व विकासासाठी वाचन गरजेचे; रामदास थिटे

शिक्रापूर (शेरखान शेख): पंधरा ऑक्टोंबर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस संपूर्ण देशभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. मात्र चौफेर वाचनाने रोज नवा विचार, कल्पना किंवा जीवन बदलण्याचा दृष्टीकोन तयार होतो, त्यामुळे आपल्या व्यक्तीगत व चौफेर व्यक्तीमत्वासाठी चौफेर वाचन केले पाहीजे, असे प्रतिपादन प्राचार्य रामदास थिटे यांनी केले आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

करंदी ग्रामपंचायतचा पुन्हा एकदा अजब ठराव

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी चुकीच्या पद्धतीने काही ठराव घेतलेले असताना त्याबाबतची चौकशी सुरु असताना आता पुन्हा करंदी ग्रामपंचायतने सरपंच व उपसरपंच यांच्या सहीचे पत्र असल्याशिवाय कोणाला देणगी अथवा लोकवर्गणी देऊ नये, असा अजब ठराव घेतल्याचे समोर आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतने यापूर्वी ग्रामसभेत काही वेगळे ठराव घेतल्याने त्याबाबत […]

अधिक वाचा..

तोतया पोलीस निरीक्षक म्हणून खेड पोलीस ठाण्यात रुबाब करणाऱ्यास अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): खेड तालुक्यात मी पोलीस निरीक्षक असुन माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे फोनवरुन सांगुन पोलिसात तक्रार दाखल असलेल्या तक्रारदाराला मदत करतो, त्याचा मोबदला द्यावा लागेल, असे म्हणणाऱ्या व त्याबाबत चौकशी करणाऱ्या पोलिसांवर रुबाब करणाऱ्या तोतया पोलीस निरीक्षकाला खेड पोलिसांनी गजाआड केल्याची खळबळजनक घटना खेड पोलीस ठाण्यात घडली असून संदिपराजे गणतराव निंबाळकर असे अटक […]

अधिक वाचा..