शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एका युवकाने दारु नाही पाजली म्हणून सदर युवका सह त्याच्या भावाला मारहाण करत जखमी केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिरुर येथील संगमनाथ कनजे हा दुचाकीला पेट्रोल टाकण्यासाठी गेला असता त्याला तेथे फिरोज हा भेटला त्यावेळी फिरोज हा मला दारु पाज, असे म्हणाला तेव्हा संगमनाथ हा मी नाही पाहू शकत असे म्हणाला. त्यामुळे फिरोज याने त्याला शिवीगाळ, दमदाटी करत शेजारी पडलेल्या बांबूने मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी संगमनाथचा भाऊ सचिन हा मध्ये आला असता त्याला देखील त्याने दगडाने मारहाण करत दोघांना जखमी केले.
याबाबत संगमनाथ नागनाथ कनजे (वय ३८) रा. सावतामाळी नगर शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे याने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी येथे पिया उर्फ फिरोज बंडूभाई तांबोळी रा. भाजीबाजार शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रताप टेंगले हे करत आहे.