शिरुर तालुक्यातील तो नरभक्षक बिबटया अदयापही सापडेना

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील १९ वर्षीय पुजा नरवडे या युवतीवर हल्ला करुन ठार मारणारा नरभक्षक बिबटया ४ दिवस ऊलटूनही अदयाप गजाआड न झाल्याने जांबुतसह बेट परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे दिवसाही शेतामध्ये कामासाठी जाण्यास शेतकरी, मजूर घाबरत आहे. वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी ठाण मांडून रात्रंदिवस विविध प्रयोग राबवत बिबटया पकडण्यासाठी अतोनात […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: मुलांच्या करिअरच्या चिंतेने थोडी पळापळ होऊ शकते. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे आणि घरात तुमच्यापेक्षा लहान सदस्यांचे सहकार्य मिळेल. वृषभ: आज तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने तुम्ही ऑफिसमधील सर्व प्रकारचे अडथळे आणि अडथळे दूर करत राहाल. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला काही महत्त्वाच्या बातम्या मिळतील. स्थावर मालमत्तेशी संबंधित कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काळजी घ्या. मिथुन: काही दिवसांपूर्वी […]

अधिक वाचा..

अजित पवार यांच्या पत्नीने पैसे देण्याचा हट्ट का धरला?

पुणे: नेते, मंत्री किंवा पदाधिकारी हे अनेकदा सामाजिक जीवनात वावरत असतांना खरेदी करतांना दिसत नाही. तशी त्यांच्याकडे यंत्रणा कार्यरतच असते. अनेक कार्यकर्ते, नोकर यांच्याकडूनच तशी कामे करुन घेतली जातात. पण, असे काही प्रसंग असतात की तिथे पैसे देण्याची वेळ येते. तेव्हा जवळ असलेल्या जवळच्या व्यक्तिकडून पैसे घेतले जातात. मग कुठे दान धर्म असो, ओवाळणी असो […]

अधिक वाचा..

आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत; जयंत पाटील

जळगाव: आपली सत्ता गेली तरी सत्व आपले शाबूत आहे. आपण स्वाभिमान जपला म्हणून आपण ताठ मानेने लोकांच्या समोर जावू शकतो. त्यामुळे लोकांपर्यंत जा. येत्या दीड – दोन वर्षात निवडणुका लागतील. आपण लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. जळगाव शहर व जिल्हयाचा आढावा […]

अधिक वाचा..

बिबटयाच्या हल्ल्याच्या पार्श्वभुमिवर शेतीला दिवसा विज द्या; डॉ. अमोल कोल्हे

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्नर वनविभाग अंतर्गत येणाऱ्या जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात बिबट्याचे शेतकऱ्यांवरील वाढलेले हल्ले चिंताजनक आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा असल्याने शेतीला पाणी भरण्यासाठी बिबटयाच्या व विषारी सर्पाच्या भितीने जीव मुठीत धरुन शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे शेतात राबणाऱ्या शेतकरी राजाला भयमुक्त वातावरण उपलब्ध करुन देणे गरजेचे असून शेतकऱ्यांच्या सुरक्षेच्या […]

अधिक वाचा..

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा अन्यथा…

मुंबई: राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था यंदा अत्यंत बिकट झाली असून अतिवृष्टीने शेतमालाचे प्रचंड नुकसान केले. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकरी तर नैसर्गिक संकटामुळे हतबल झाला आहे. शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या मदतीचा छदामही अजून मिळालेला नाही, पंचनामे करण्यातही प्रशासन ढिम्म असून आता परतीच्या पावसानेही शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अन्यथा […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दिवस कसा असेल

मेष: आज कौटुंबिक वाढीचे संकेत असतील. म्हणजेच आज तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात. एवढेच नाही तर आज सरकारी कामात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सतत नवीन अडचणींमुळे त्रास होईल. वृषभ: आजचा दिवस तुम्हाला परदेश आणि गुंतवणुकीच्या बाबतीत अचानक लाभ देणारा असेल. एवढेच नाही तर आज सर्व संकटातही तुमचे मित्र […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात ऐन दिवाळीच्या सणाला पुन्हा गोरगरीबांच्या दुकानावर वरवंटा फिरवणार?

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये काही वर्षापूर्वी पाबळ फाटा ते पोस्ट ऑफिस (शिवसेवा, नगरपालिका मधील गाळे सोडून) पर्यंत गोरगरीब जनतेच्या टपऱ्या व काही लोकांची घरे तोडून रस्ता रुंदीकरण करण्यात आले होते. गरीब लोक भरमसाठ डिपॉझिट व अनाठाई भाडे देऊ शकत नसल्याने, रोडच्या शेजारी हातगाडी लावून काही तरी उद्योगधंदा करुन आपल्या मुलाबाळांची खळगी भरत आहे. ऐन […]

अधिक वाचा..

अन पुजाचे कलेक्टर होण्याचे स्वप्न अखेर राहिले अधुरे

शिरुर (अरुणकुमार मोटे): “माझी पोरगी लयं हुशार व्हती सायेब, तिला कलेक्टर व्हायचं व्हतं, माझ घरदार तीच पुढं घेऊन जाणारी व्हती ओ, पण तीच आम्हाला सोडून गेली, आता सारं संपलय” असा निशब्द शांततेत हुंदका ऐकला अन भिमाशंकर सहकारी कारखान्याचे संचालक प्रदिप वळसेंच्या डोळ्यात चटकन अश्रू तराळले. अन उपस्थितांनाही गहिवरुन आले. अंत्यसंस्कारावेळी जांबूत ग्रामस्थांनी सुमारे १ लाखाहून […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे रस्ता ओलांडताना कंटेनरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावर भेळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या सरदवाडी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी सातत्याने मागणी होत असुन 9 ऑक्टोबर रोजी येथे रात्री 8 च्या सुमारास रस्ता ओलांडताना कंटेनरने धडक दिल्याने अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची […]

अधिक वाचा..