मांडवगण फराटा येथील जगताप कुटुंबातील तीन भावंडांनी शाळेसाठी केली लाखों रुपयांची जमीन दान

मांडवगण फराटा (संपत कारकुड) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील मांडवगण फराटा येथील जगतापवाडी तील तीन भावंडांनी गोर-गरीबांच्या मुलांना घराजवळच प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शाळेला तब्बल सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केली आहे. मांडवगण परीसरात शेत जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असताना शाळेसाठी सात गुंठे जमीन बक्षीसपत्र करुन दान केल्याने जगताप कुटुंबियांवर आसपासच्या परीसरातुन कौतुकाचा वर्षाव […]

अधिक वाचा..

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

शिरुर (अरुणकुमार मोटे ) शिरुर तालुक्यातील जांबूत येथे बिबट्याच्या हल्ल्यात ५५ वर्षीय मुक्ताबाई खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि २६) रोजी घडली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील दोन वर्षांतील मृत्यूची ही पाचवी घटना आहे. मात्र वनविभागाकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने ग्रामस्थांसह नातेवाईकांनी वनविभागाच्या कारभारावर संताप व्यक्त […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती; मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना, पोलिस निरीक्षक अनिता खेडकर

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) सध्या सोशल मिडियाचा ट्रेंड असुन शाळकरी तसेच कॉलेजच्या मुलीं सोशल मिडीयावरील आभासी दुनियेत अडकून प्रेमाच्या जाळ्यात फसतात. परंतु मुलींनो चंद्रासारख्या शितल नाही तर सुर्या सारख्या प्रखर बना आणि समोर येणाऱ्या वाईट प्रवृत्तीचा सामना करायला शिका असे प्रतिपादन पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस निरीक्षक अनिता खेडकर यांनी केले. रांजणगाव गणपती (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

जांबुत येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांसह नातेवाईकांचा नकार

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबुत (ता. शिरुर) येथे सोमवारी (दि २६) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मुक्ताबाई भाऊ खाडे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जांबुत ग्रामस्थांनी आक्रमकतेचा पवित्रा घेत वनविभागाच्या विरोधात संताप व्यक्त केला असुन नातेवाईक व कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास थेट नकार दिला असल्याची माहिती समोर येत आहे. गेली दोन वर्षात बिबट्याच्या हल्ल्यात […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील बाबुरावनगर येथून पोलीस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका हि चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. त्यामुळे जर पोलिसांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय…? असा सवाल आता शिरुर शहरातील नागरीक उपस्थित करत आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि २५) ऑगस्ट रोजी पहाटे ३:५८ […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनी १० ते १५ दिवस बंद ठेवण्याचे MIDC चे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांचे आदेश

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) कंपनीतील विषारी केमिकलचे पाणी कोणतीही प्रक्रिया न करता सोडून देत असल्यामुळे पुढील दहा ते पंधरा दिवसांसाठी महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड (MEPL) बंद ठेवण्याचे आदेश एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिले आहेत. त्यामुळे या कंपनी विरोधात पाच गावच्या ग्रामस्थांनी (दि २८) ऑगस्ट […]

अधिक वाचा..

जांबुत येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार, जांबुत येथील चौथी घटना, वनविभागाचा गलथान कारभार समोर

शिरुर (अरुणकुमार मोटे) जांबूत (ता.शिरुर) येथील ५५ वर्षीय महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज (दि.२६) घडली असुन जांबुतच्या बागवस्ती परिसरात हादुर्दैवी प्रकार घडला आहे. मुक्ताबाई भाऊ खाडे असे या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. यामुळे वनविभागाचा गलथान कारभार समोर आला असुन शिरुर वनविभागाविरुद्ध नागरिकांचा प्रंचड रोष वाढलेला आहे .वनपरिक्षेत्र अधिकारी हे मनमानी कारभार […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांची ‘दहा इलेव्हन कॅफे’ वर धडक कारवाई, मुला-मुलींचे अश्लील वर्तन; कॅफे चालकावर गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील शाळेतील अल्पवयीन मुले तसेच कॉलेज मधील मुलामुलींना अश्लील वर्तन करण्याची मुभा देऊन त्यासाठी अवैध पार्टीशन टाकलेल्या शिरुर शहरातील ‘दहा ईलेव्हन कॅफे’ वर शिरुर पोलिसांनी साध्या वेशात ग्राहक म्हणुन जाऊन छापा टाकुन कॅफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. शिरुर शहरातील सर्व अवैध कॅफे बंद करण्याची मागणी शिरूर शहरातील नागरिकांकडुन होत आहे. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथील अंकुश खर्डे वय (६०) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या असुन त्यांच्यावर शिरुर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हि घटना (ता.२६) रोजी सकाळी सहा वाजता कान्हूर मेसाई येथील ढगेवाडी वस्तीवर घडली.   ढगेवाडी वस्तीवर अंकुश […]

अधिक वाचा..

शिरुर; साळवे यांच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नाही, शाळेच्या बदनामीच्या कटाविरुद्ध न्यायालयात जाणार; नॅन्सी पायस

शिरुर (अरुणकुमार मोटे) गेल्या वीस वर्षांपासुन ‘सेंट जोसेफ’ हि शाळा शिरुर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असुन आम्ही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाने शिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहोत. साळवे यांनी आमच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसून, आमच्या शाळेच्या बदनामीचा हा कट केला असल्याचे सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी शिरुर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. फिर्यादी सुमन साळवे, […]

अधिक वाचा..