एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणर; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरात ३००० हून अधिक अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, प्रत्येक आगार व प्रमुख बसस्थानकांवरही ही कार्डे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवीन NCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी १९९ रुपये, तर यापूर्वी स्मार्ट […]

अधिक वाचा..

सह्याद्री हॉस्पिटलची जागा ना विकता येणार ना भाड्याने देता येणार, 6400 कोटींचा व्यवहार अडचणीत

पुणे: पुण्यातील मोठी रुग्णालय साखळी असलेलं सह्याद्री हॉस्पिटल्सची विक्री हा सध्या राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील चर्चेचा विषय आहे. भारतातील आघाडीची रुग्णालय साखळी असलेल्या मणिपाल हॉस्पिटल्सने ही खरेदी केली आहे. हा संपूर्ण व्यवहार 6,400 कोटी रुपयांना झाल्याची माहिती आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रातील मोठ्या व्यवहारांपैकी एक असलेला हा व्यवहार आता अडचणीत सापडलाय. पुणे महानगरपालिकेने कोकण मित्र मंडळ मेडिकल […]

अधिक वाचा..

बैलगाडा स्पर्धेतील शिल्या बैलाची तब्बल ११,११,१११ रुपयांना विक्री

प्रगतशील शेतकरी प्रकाश मेचे यांचा गौरव शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे गावाने पुन्हा एकदा बैलगाडा स्पर्धांच्या क्षेत्रात आपली शान सिद्ध केली आहे. येथील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक व प्रगतशील शेतकरी प्रकाश बबन मेचे यांच्या बैलगाडा स्पर्धेतीलशिल्या या बैलाची तब्बल ११,११,१११ रुपयांना विक्री झाला असून, ही बातमी संपूर्ण तालुक्यात कौतुकाचा विषय ठरली आहे. सदर बैलाने अनेक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात बनावट व्यक्तीने विकली चक्क जमीन

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून जमिनीचा मी मालक आहे असे भासवून एका व्यक्तीची जमीन चक्क खरेदीखताने विक्री केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर तालुक्यातील एका ठिकाणी यशवंत पटेल यांच्या मालकीची जमीन असून त्यांच्या नावाने एका व्यक्तीने बनावट ओळखपत्र बनवून […]

अधिक वाचा..