लाडक्या बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ₹1500; ₹3000 च्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुलै महिन्याच्या सन्मान निधीच्या वितरणाची तांत्रिक प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली असून, पात्र महिलांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यात ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून ₹3000 एकाचवेळी खात्यात जमा होणार, अशी […]

अधिक वाचा..

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाच्या चर्चेला वेग; महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या टीमची घोषणा केल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेला वेग आला आहे. पुढील काही महिन्यांत केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे बदल होण्याची शक्यता असून, तरुण आणि महिला नेत्यांना अधिक संधी देण्याबरोबरच काही राज्यांना अतिरिक्त प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पंतप्रधान […]

अधिक वाचा..

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक दिल्ली गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या भेटीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीची माहिती सोशल मीडियावरून दिली. महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र सरकारच्या सहकार्याने […]

अधिक वाचा..

शिंदे मुख्यमंत्री होणार? चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांचा पूर्णविराम; म्हणाले…

मुंबई: राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत विविध चर्चा रंगू लागल्या असतानाच मुख्यमंत्री यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करून यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तासमीकरणांबाबत चर्चा सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना फडणवीस म्हणाले, “ज्या राज्यात बहुमतासाठी १४७ जागांची आवश्यकता असते आणि […]

अधिक वाचा..

पद्म पुरस्कार समितीवरून सत्तेत अंतर्गत राजकारणाचा वाद; आशिष शेलार यांना डावलल्याची चर्चा

मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. हा निर्णय केवळ प्रशासकीय नसून सत्तेतील अंतर्गत समीकरणांचे प्रतिबिंब असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. समितीच्या रचनेतून काही वरिष्ठ नेत्यांना दूर ठेवण्यात आल्याची बाब गंभीर मानली जात असून, विशेषतः आशिष शेलार यांच्यासारख्या पक्षनिष्ठ नेत्याला वगळण्यात आल्याने नाराजी […]

अधिक वाचा..