अजितदादांच्या शैलीतच सुनेत्रा पवारांचा अधिकाऱ्यांना इशारा; गुणवत्तेशी तडजोड सहन केली जाणार नाही

पुणे : अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदासह पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहे. गुरुवारी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पालकमंत्री म्हणून त्यांनी प्रथमच उपस्थिती लावली. या बैठकीत त्यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचीच झलक दाखवत अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि ठोस सूचना दिल्या. बैठकीत जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. कामांची सद्यस्थिती, […]

अधिक वाचा..

महिला सरपंचांच्या नावावर पतीचा कारभार आता चालणार नाही

औरंगाबाद: ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच निवडून आल्यानंतरही प्रत्यक्षात त्यांचा कारभार त्यांचे पतीच पाहत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या ‘सरपंच पती’ प्रथेला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारने कठोर पावले उचलण्याचे ठरवले आहे. पंचायत राज मंत्रालयाचा मोठा निर्णय केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव सुशीलकुमार लोहाणी यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मॉडल वूमन फ्रेंडली […]

अधिक वाचा..

लैंगिक अत्याचार सहन केला जाणार नाही; पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे

सांगलीतील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल सांगली: करगणी (ता. आटपाडी, जि. सांगली) येथे घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक घटनेनंतर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कठोर कारवाईची मागणी केली. अत्याचारानंतर मानसिक व सामाजिक दबावामुळे पीडित मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या मातीत माजोरीगिरी खपवून घेतली जाणार नाही

मुंबई: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, इथली माती, हवा, पाणी, संस्कृती आणि भाषा मराठी आहे. या भूमीत येऊन पोट भरायचं, पाय रोवायचे, धंदा-पाणी करायचं, मोठं व्हायचं आणि वर इथल्या भाषेकडे तुच्छतेने पाहायचं? महाराष्ट्राच्या मातीवर उगवून तिच्याच संस्कृतीला हरामखोरीने झिडकारणाऱ्या प्रवृत्तीना आता ठेचल्याशिवाय राहणार नाही!राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. […]

अधिक वाचा..

मराठी ही सामर्थ्यशाली भाषा आहे मराठी भाषिकांवरील अन्याय, दादागिरी सहन केली जाणार नाही

मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२४ चे मराठी भाषा व उद्योगमंत्री ना. उदयजी सामंत आणि उपसभापती डॉ नीलम गोर्हे यांच्या हस्ते उदघाटन मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभाग ,ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य , जिल्हा ग्रंथ अधिकारी कार्यालय मुंबई शहर आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर यांच्या वतीने ,मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ५व […]

अधिक वाचा..

मुंबईतील सुविधांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कांदिवलीतील ‘स्कायवॉक’, सरकता जीन्याचे भूमिपूजन श्रीकृष्णनगर नदीवरील पुलाचे लोकार्पण मुंबई: कांदिवलीच्या समता नगर येथील स्कायवॉक आणि सरकता जीना हा सर्वसामान्य नागरिकांना उपयोगी पडणार आहे. या स्कायवॉकमुळे सर्वसामान्यांचे पैसे आणि वेळ वाचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्रवीण दरेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्हि.आर. श्रीनिवास आदी […]

अधिक वाचा..

महिलांवर होणारे अन्याय सहन करणार नाही; तृप्ती देसाई

शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्रामध्ये हुंडा मुक्त महाराष्ट्र, हुंडा विरोधी चळवळ सुरु करण्यात आलेली असून स्त्री स्त्रीभ्रूण हत्या मुक्त महाराष्ट्र आम्ही करणार असून महिलांवर होणारे अन्याय आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच भूमाता ब्रिगेड व भूमाता फाउंडेशनच्या शिरुर तालुका कार्यालयाचे उद्धाटन […]

अधिक वाचा..