चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी काही घरगुती उपाय 

आरोग्य

१) एक बटाटा घेऊन तो स्वच्छ धुवायचा आणि सालीसकट किसून घ्यायचा.

२) त्यानंतर गाळणीच्या साह्याने हा किस गाळून त्याचा रस काढायचा.

३) साधारणपणे १५ मिनीटे हा गाळलेला रस तसाच ठेवायचा म्हणजे बटाट्याचा स्टार्च खाली राहील आणि पाणी वर येईल.

४) वरचे पाणी काढून टाकल्यावर खाली पांढरा थर दिसेल त्या स्टार्चमध्ये साधारण १ चमचा कोरफडीची जेल घालायची.

५) बाजारात मिळणाऱ्या व्हिटॅमिन इ ऑइलच्या २ कॅप्सूल यामध्ये घालायच्या आणि हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.

६) एका छोट्या डबीत ही क्रिम भरुन ठेवायची आणि रात्री झोपताना, दुपारी किंवा अगदी सकाळी उठल्यावर ही क्रीम चेहऱ्याला लावायची.

७)  साधारणपणे अर्धा तास ही क्रिम चेहऱ्यावर तशीच ठेवून नंतर चेहरा धुवून टाकायचा. यामुळे चेहऱ्यावरील डाग, पुरळ, काळेपणा पूर्ण दूर व्हायला मदत होईल.

(सोशल मीडियावरुन साभार)