शिरुरला पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी चार्ज घेताच पोलिस ऍक्शन मोडमध्ये

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनचा नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी चार्ज घेताच पोलिस स्टेशनचे कर्मचारी ऍक्शन मोडमध्ये आले असुन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या अवैध धंद्यावर बेधडक कारवाई चालु केली असुन शिरुर शहरातील वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 24 वाहन चालकावर कडक कारवाई करत 35 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच शनिवार (दि 22) रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी शिरुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चोख बंदोबस्त ठेवत शिरुर शहराकडे येणारा रस्ता नागरिकांसाठी मोकळा करण्यात आला.

शिरुर शहरात ST स्टँड परिसर, BJ कॉर्नर, CT बोरा कॉलेज रोड, निर्माण प्लाझा या ठिकाणी ट्रिपल सीट, विना लायसन गाडी चालविणे, विना नंबर प्लेट, ब्लॅक फिलमिंग अशा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. हि कारवाई पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, पोलिस फौजदार अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार शेखर झाडबुके, वीरेंद्र सुम्बे ,अर्जुन भालसिंग, महिला अंमलदार भाग्यश्री जाधव यांनी केली.

कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या आवारात वाहतूक कोंडी कमी होणार…?

शिरुर पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव अनिल ढोकले यांच्याशी सविस्तर चर्चा करुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शेतमाल विक्रीसाठी बसणाऱ्या व्यक्तींसाठी बाजार समितीच्या आत जागा द्याव्यात. याबाबत चर्चा करुन तो प्रश्न सोडविण्यासाठी काही सुचना केल्या होत्या. त्यानुसार शनिवार (दि 23) रोजी पोलीस बंदोबस्त देऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर रस्त्यावर कोणालाही बसू न देता शिरूर शहराकडे येणारा रस्ता नागरिकांसाठी मोकळा केला. सदरचा रस्ता मोकळा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक स्नेहल चरापले, सहायक फौजदार अनिल चव्हाण, पोलिस अंमलदार राजेंद्र गोपाळे वीरेंद्र सूम्बे,भाग्यश्री जाधव यांनी केली.

तसेच यापुढे दर शनिवारी आठवडे बाजारच्या दिवशी वाहतुक कोंडी होऊ देणार नाही. तसेच शिरुर शहरातील कोणत्याही रस्त्यावर यापुढे वाहतुक कोंडी होणार नाही. यासाठी नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन एकत्र मिळून यासाठी चांगले प्रयत्न करु असे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले.