शिक्रापूर (योगेश शेंडगे) : शिरूर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रोडवर घोलपवाडी येथे शुक्रवारी (ता. २१) सकाळी नऊ च्या सुमारास दुचाकीला पाठीमागून वेगात येणाऱ्या दुचाकीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात भगवान रामभाऊ कर्पे (वय ६५, रा.कर्पे वस्ती, टाकळी भीमा) या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तळेगाव-न्हावरे रस्त्यावर घोलप वाडी येथे पाठीमागून वेगात दुचाकीवर आलेल्या गुड्डू कुमार (सध्या रा. पिंपळे धुमाळ, ता. शिरूर, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्या दुचाकीची कर्पे यांना जोरात धडक बसली. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर तळेगाव ढमढेरे येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना वाघोली येथील दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर शिक्रापूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शिक्रापूर पोलिसांनी रूपेश रामदास साकोरे यांच्या फिर्यादी वरून गुड्डू कुमार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या रोडवर अपघाताचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसांपूर्वी याच रस्त्यावर सुखदेव म्हस्के या ज्येष्ठ नागरिकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. रस्त्यावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी माहितीदर्शक फलक, गतिरोधक बसवावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी केली आहे.
तळेगाव-न्हावरे रोडवर ज्येष्ठ नागरिकाला धडक देऊन पिकअप चालकाने ठोकली धूम…
कवठे येमाई येथे अपघातात एक ठार, दुसरा गंभीर जखमी…
भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी…
अष्टविनायक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत मोटरसायकल स्वाराचा मृत्यू…
शिरूर तालुक्यात महिलेच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून मृत्यू…
रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार