ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरबसल्या मोबाइलवरून ‘असा’ करा ऑनलाइन अर्ज…

महाराष्ट्र

मुंबई: जर तुम्हालाही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. लर्निंग लायसन्सनंतर पर्मनंट लायसन्स मिळते. लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स (LLR) साठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वप्रथम sarathi.parivahan.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.

त्यानंतर “ऑनलाइन सेवा” पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर”लर्निंग लायसन्स” लिंकवर क्लिक करा.

त्यानंतर तुमचे राज्य निवडा.

त्यानंतर “अर्जदार” या पर्यायाची निवड करा.

आता तुमचा आधार कार्ड नंबर आणि आधार लिंक मोबाईल नंबर टाका.

त्यानंतर “जनरेट ओटीपी” वर क्लिक करा.

आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करून “सबमिट” पर्यायावर क्लिक करा.

यापुढे आता तुम्हाला एक अर्ज भरावा लागेल.

त्या अर्जामध्ये तुमची सर्व वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि इतर आवश्यक माहिती भरा.

आता तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

त्यानंतर “फी” टॅबवर क्लिक करून तुमच्या राज्य सरकारने ठरवून दिलेली फी भरा अन् “सबमिट” पर्यायावर क्लिक करा.

लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

पासपोर्ट साईज फोटो

स्वाक्षरी

फी