dr-namdev-shendkar

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर तालुका

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी तसेच विविध शिष्यवृत्ती विषयक उपक्रमांमुळे पुणे जिल्हा मार्गदर्शक ठरत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी आहे, असे पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नामदेव शेंडकर यांनी म्हटले आहे.

शिरूरमध्ये मुख्याध्यापक सहविचार सभेत ते बोलत होते. डॉ. विकास गरड यांनी सन 2025- 26 सन 2026 -27 त्या दोन वर्षात प्रशिक्षण शिक्षक व्यवस्थापन प्रणाली (TMS) विकसित केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणे एकाच छत्राखाली आणली असून सर्व प्रणाली ऑनलाइन स्वरूपाची आहे. यामध्ये शिक्षक उपस्थिती पासून शिक्षकांचे कार्यमुक्ती प्रमाणपत्र व प्रशिक्षण प्रमाणपत्र हे ऑनलाइन स्वरूपात दिले जाते. सदर प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे पुणे जिल्ह्यात प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत यशस्वी होत चालले आहेत. ऑनलाइन प्रणाली विकसित असल्यामुळे शिक्षक प्रशिक्षणाची माहिती एका क्लिकवर प्राप्त होते. प्रमाणपत्र व कार्यमुक्ती प्रमाणपत्र यावर ऑटो जनरेट प्रमाणपत्र क्रमांक येत असल्यामुळे याचे डुप्लिकेशन करता येत नाही. प्रमाणपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करतात शिक्षकांनी केलेल्या प्रशिक्षणाची माहिती प्राप्त होते. ”

शिरूर तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग व शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहविचार सभेत मार्गदर्शन करताना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. नामदेव शेंडकर बोलत होते. सदर सभा विद्याधाम प्रशाला, शिरूर येथील सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच शालेय आस्थापना विषयक कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक व गतिमान करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, रघुनाथ पवार तसेच शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य रामदास थिटे यांनी प्री-मॅट्रिक, समाजकल्याण शिष्यवृत्ती, व्हीएसके, प्रशस्त ॲप, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, निपुण महाराष्ट्र, नवभारत साक्षरता, संच मान्यता, आधार वैधता, इको क्लब आदी विविध शैक्षणिक व प्रशासकीय उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे सचिव बाळासाहेब चव्हाण, कार्याध्यक्ष नामदेव चौधरी, उपाध्यक्ष प्रकाश गावडे, रामनाथ इथापे, गुलाबराव डाळिंबकर, बाळासाहेब सोनवणे, प्राचार्य मारुती कदम, राजाराम ढवळे, राजेश सोनावणे, संतोष दौंडकर, अशोक दहिफळे, प्राचार्य वनवे सर , स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पुणे विभाग प्रमुख प्राचार्य अनिल साकोरे, सेकंडरी सोसायटीचे संचालक प्राचार्य तुकाराम बेनके, राज्य आश्रमशाळा महासंघाचे उपाध्यक्ष तुकाराम शिरसाट, समाजकल्याण विभागाचे समन्वयक किरण बोडके, संदीप क्षीरसागर , केंद्रप्रमुख विविध प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रामदास थिटे यांनी केले. सूत्रसंचालन प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष नामदेव चौधरी यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत