स्वयंपाक करताना ५ गोष्टी कटाक्षाने टाळा, स्वत:सह कुटूंबाच्याही जीवाला धोका

आरोग्य

आपलं स्वयंपाक घर म्हणजे जणू आपलं आरोग्य जपणारं आपल्या घरातलं एक ठिकाण असतं. कारण स्वयंपाक घरात ज्या पद्धतीने जे काही पदार्थ तयार केले जातात तेच आपण बहुतांश वेळा खातो आणि त्यातूनच आपली तब्येत, आरोग्य सांभाळलं जातं. आता स्वयंपाक घरातच काही गोष्टींमध्ये चुका होत असतील तर त्याचा परिणाम थेट घरातल्या सगळ्या सदस्यांच्या आरोग्यावर होणारच. म्हणूनच स्वयंपाक करणाऱ्या किंवा स्वयंपाक घरात काम करणाऱ्या प्रत्येकाने या काही गोष्टी अगदी कटाक्षाने लक्षात ठेवायलाच पाहिजेत.

स्वयंपाक घरात काम करताना ४ चुका टाळा

१) पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरात असणारं संगमरवरी खलबत्ता किंवा पोळपाट- लाटणं कधीही साबण लावून घासू नका. कारण साबणाच्या कणांची आणि त्याची रिॲक्शन होऊन त्यात काही सुक्ष्म पदार्थ तयार होतात. ते तब्येतीसाठी हानिकारक ठरू शकतात.

२) दुसरी गोष्ट म्हणजे प्लास्टिकच्या पिशवीत घालून बाजारातून घरी आणलेल्या भाज्या, धान्यं किंवा इतर खाद्यपदार्थ तात्काळ पिशवीतून बाहेर काढा. दिवसेंदिवस या पिशव्यांमध्ये खाद्यपदार्थ राहाणं अजिबात चांगलं नाही.

३) अनेक घरांमध्ये धान्य, साखर गूळ प्लास्टिकच्या पिशवीतच ठेवलेले असतात. हे पदार्थ डब्यात भरून ठेवावे.

४) पिठांच्या डब्यामध्ये प्लास्टिकचे चमचे टाकून ठेवलेले असतात. पीठ घेणं सोपं पडावं म्हणून ही सोय असते. पण असे महिनोंमहिने प्लास्टिकचे चमचे डब्यात टाकून ठेवणं आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.

5) मायक्रोवेव्ह सेफ असं जरी प्लास्टिकच्या कंटेनरवर लिहिलेलं असलं तरी ते मायक्रोवेव्हमध्ये वापरू नये. त्याऐवजी नेहमी काचेच्या भांड्यांचाच वापर करावा.

(सोशल मीडियावरून साभार)