Video; शिरुर महसूलचा वाळू माफियांना दणका; ६ बोटी व ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उध्वस्त

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर महसूल विभागाने पुन्हा एकदा अवैध वाळू उपशावर मोठी कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला. मंगळवार (दि १२) रोजी केलेल्या कारवाईत तब्बल ६ यांत्रिक बोटी तसेच ८ फायबर जिलेटिनच्या साहाय्याने उध्वस्त केल्या. अचानक केलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के तसेच पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी संयुक्तपणे कारवाई करत १५ जणांचे पथक तयार करुन चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणात बेसुमार वाळूउपसा करणाऱ्या ६ यांत्रिक बोटी आणि ८ फायबर स्फोटकाने उडवुन दिल्या.

 

शिरुरच्या नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगत घोड नदीपात्रात पथक उतरवले. या पथकाने स्वयंचलित बोटीच्या साह्याने पाठलाग करत वाळु माफियांच्या यांत्रिक बोटी गाठल्या. त्यानंतर वाळू माफियांच्या ६ बोटी आणि ८ फायबर जिलेटिनच्या साह्याने उडवून देण्यात आले.

 

या कारवाई पथकात नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, मंडलाधिकारी नंदकुमार खरात, प्रशांत कांबळे, राजू बडे, योगेश टिळेकर, आदित्य गायकवाड, अक्षय तांबट, हर्षद साबळे, रुपेश रोट्टी, श्रीकांत आढाव, आलिशा महाकाळ आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

Video; महसुल दिनाच्या पुर्व संध्येला घोड धरणात महसूलने वाळूमाफियांच्या दोन यांत्रिक बोटी उडवल्या