शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल 71.14 टक्के मतदान नोंदवले. दुपारी संथ गतीने सुरू झालेली मतदान प्रक्रिया संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत जोर पकडत बहुतेक प्रभागांत समाधानकारक टक्केवारी नोंदली गेली. शिरूर नगरपरीषदेचे एकूण मतदार 32993 असून त्यापैकी एकूण मतदान 23472 झाले आहे.
प्रभागनिहाय मतदानाची आकडेवारी (५.३० वाजेअखेर):
प्रभाग 1: 74.16%
प्रभाग 2: 74.93%
प्रभाग 3: 68.49%
प्रभाग 4: 70.97%
प्रभाग 5: 70.80%
प्रभाग 6: 74.62%
प्रभाग 7: 72.22%
प्रभाग 8: सर्वात कमी – 63.07%
प्रभाग 9: 70.49%
प्रभाग 10: 71.89%
प्रभाग 11: 73.82%
प्रभाग 12: 71.80%
यामध्ये प्रभाग 2 हा सर्वाधिक मतदान (74.93%) नोंदवणारा प्रभाग ठरला असून, प्रभाग 8 मध्ये सर्वात कमी (63.07%) मतदान झाले.
महिला मतदारांचा चांगला प्रतिसाद….
एकूण 16,692 महिला मतदारांपैकी 11,710 महिलांनी मतदान करून राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग दर्शवला, तर 16,300 पुरुषांपैकी 11,762 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. तृतीयपंथी मतदार एक असून त्यांनीही मतदान केले. दिवसभर शांततेत मतदान पार पडले. मतदान केंद्रांवर सकाळपासूनच रांगा दिसू लागल्या होत्या. मतदानाच्या टक्केवारीवरून नागरिकांमध्ये निवडणुकीबाबतची उत्सुकता व जागरूकता अधोरेखित झाल्याचे स्पष्ट होत आहे. आता सर्वांचे लक्ष (दि. २१) रोजी लांबलेल्या निकालाकडे लागले असून शिरूर नगरपरिषद कोणाच्या हाती जाणार याची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे.