पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची आस्थेवाईक विचारपूस

महाराष्ट्र

कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेची आस्थेने चौकशी केली. गुरुवारी खराब हवामानामुळे शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली होती. त्यानंतर हेलिकॉप्टरला जुहू येथील पवनहंस येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः शिंदे यांच्याशी संवाद साधत काळजी घेण्याचा सल्ला दिला.

पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री Suvendu Adhikari यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री Sunetra Pawar हे कोलकात्यात उपस्थित होते.

शपथविधी सोहळ्यादरम्यान पंतप्रधान मोदी विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिवादन करत पुढे जात असताना ते अचानक एकनाथ शिंदे यांच्याजवळ थांबले. दोघांमध्ये काही क्षण चर्चा झाली. यावेळी मोदी यांनी हेलिकॉप्टर प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेची माहिती मिळाल्याचे सांगत शिंदे यांची विचारपूस केली. तसेच भविष्यात विमानप्रवास करताना अधिक काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

मोदी आणि शिंदे यांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, त्या चर्चेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, प्रत्यक्षात पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांच्या सुरक्षिततेची आस्थेने चौकशी केल्याचे समोर आले. या छोट्याशा प्रसंगातून सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत पंतप्रधान किती संवेदनशील आणि दक्ष आहेत, हे पुन्हा अधोरेखित झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत