नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची १५ दिवसांत चौकशी; शेतकऱ्यांवर जबरदस्ती नको; विजय वडेट्टीवार

मुंबई: नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रिंगरोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. या प्रकरणात अलायन्मेंट बदल, शेतकऱ्यांवर दबाव, तसेच अधिकाऱ्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात वडेट्टीवार यांनी सांगितले की, रिंगरोडसाठी करण्यात आलेल्या भूसंपादनात गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी […]

अधिक वाचा..

सोनेसांगवी सभामंडप प्रकरणी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे चौकशीचे आदेश; ग्रामपंचायत कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सोनेसांगवी येथील अनुसूचित जाती-जमाती समाजासाठी मंजूर करण्यात आलेल्या सभामंडपाच्या कामातील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारीची राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गंभीर दखल घेतली आहे. समाजकल्याण आयुक्त आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती तक्रारदार अमोल बोऱ्हाडे यांनी […]

अधिक वाचा..

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक तरतूद या निर्णयांना काँग्रेसचा विरोध नसला, तरी हे निर्णय विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात जाहीर करण्यात आल्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते व माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी म्हटले आहे. गाडगीळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे विचारले की, राज्यात आचारसंहिता लागू […]

अधिक वाचा..

पंतप्रधान मोदींकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची आस्थेवाईक विचारपूस

कोलकाता : पंतप्रधान Narendra Modi यांनी आज उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्याजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची आणि सुरक्षिततेची आस्थेने चौकशी केली. गुरुवारी खराब हवामानामुळे शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली होती. त्यानंतर हेलिकॉप्टरला जुहू येथील पवनहंस येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः शिंदे यांच्याशी संवाद साधत काळजी घेण्याचा सल्ला […]

अधिक वाचा..

पुण्यातील ILS विधी महाविद्यालय शुल्क वसुली प्रकरणी चौकशी; विद्यार्थ्यांना 6% व्याजासह परतावा

मुंबई: विद्यार्थी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत पुणे येथील आय.एल.एस. विधी महाविद्यालयातील बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी राज्य शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर आधारित कारवाई करत संबंधित विद्यार्थ्यांना वसूल केलेले शुल्क ६ टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत. मंत्री पाटील […]

अधिक वाचा..

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा..

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

  नाशिक : राज्यात चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा, महिलांचे कथित शोषण आणि त्याला मिळालेल्या संभाव्य राजकीय आश्रयामुळे राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी पेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी

नागपूर: समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली. समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होत, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

अपघातावर राजकारण नको! चौकशी होईलच; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्पष्ट इशारा

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूवरून राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर शब्दांत फटकारले आहे. अपघाताची चौकशी होणारच असून या दुर्दैवी घटनेला घातपाताचा रंग देणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “कोणताही अपघात घडला की त्याची चौकशी होतेच. या […]

अधिक वाचा..