पंढरपुरात पाच एकर जागेत भव्य भक्तनिवास उभारणार; शंभूराज देसाई

महाराष्ट्र

मुंबई: पंढरपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच एकर जागेवर भव्य भक्तनिवास उभारण्यात येणार असून, यासाठी पर्यटन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.

मेघदूत शासकीय निवासस्थान येथे पंढरपूरमधील पर्यटन विभागाच्या जागेच्या विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेंकरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री देसाई यांनी सांगितले की, माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थान आणि पर्यटन विभाग यांच्या समन्वयातून हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. सर्व संबंधित विभागांच्या सूचनांचा विचार करून सर्वसमावेशक आणि दर्जेदार प्रकल्प उभारण्यात येईल.या प्रकल्पासाठी स्वतंत्र प्रकल्प सल्लागार नेमण्यात येणार असून, भक्तांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोत्कृष्ट आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत