मुंबई: राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 (NEP-2020) ची प्रभावी आणि एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी ही माहिती दिली.
या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी प्रा. डॉ. नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अधिकारी आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.
चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, Academic Bank of Credits (ABC), Major-Minor पद्धती, Internship, Indian Knowledge System (IKS), Credit Transfer, Multiple Entry-Exit, Uniform Academic Calendar तसेच शिक्षक प्रशिक्षण यांसारख्या विषयांवर ही समिती धोरणात्मक मार्गदर्शन करणार आहे.
राज्यातील विद्यापीठे व स्वायत्त महाविद्यालयांमधील NEP अंमलबजावणीचा नियमित आढावा घेऊन समिती शासनाला शिफारशी सादर करणार असून दर तीन महिन्यांनी प्रगती अहवालही देणार आहे. उच्च शिक्षण अधिक गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित, संशोधनाभिमुख आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.