आता वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावावे लागणार; अजित पवारांनी दिली महत्वाची माहित…

महाराष्ट्र

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबोधित केले. त्यांनी अदिती तटकरे यांनी आणलेल्या चौथ्या महिला धोरणाची माहिती दिली. महिला मंत्री असल्यामुळे त्यातील बारकावे अदिती यांना माहित असल्याचे पवार म्हणाले. तसेच या धोरणातील काही माहिती अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी नावात केलेला मोठा बदल सांगितला आहे.

यापुढे अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं मुल जन्माला आल्यानंतर मुलाचं नाव, वडिलांच नाव आणि आडनाव असं असायचं पण आता आपण नविन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलगा असो की मुलगी आधी मुलाचे नाव नंतर आईचं नाव, नंतर वडिलांच आणि पुढे आडनाव अस असणार आहे. कारण शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

महिलांना १ टक्का सवलत…

मी तर अर्थमंत्री या नात्याने सांगतो जर तुम्हाला एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला ६ टक्के कर मात्र महिलेच्या नावावर घेतला तर १ टक्का सवलत आहे. ५० लाखाचं घर असलं तर ५० हजार रुपये वाचतात. यापुढे महिलांनी नवरोबाला सांगावं घर घ्यायचं असेल तर माझ्या नावावर घे, पैसे वाचतील, असे अजित पवार म्हणाले.