शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात पार पडली. या बैठकीत शिरूर तालुका अध्यक्षपदी सागर रोकडे, उपाध्यक्षपदी सुनिल जिते आणि कार्याध्यक्षपदी अर्जुन शेळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. समीर राजे, राज्य उपाध्यक्ष अरुणकुमार मोटे, जिल्हा उपाध्यक्ष तेजस फडके, जिल्हा संघटक साहेबराव लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. समीर राजे म्हणाले की, “पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. आर्थिक हितसंबंध जपण्याच्या प्रयत्नातून पत्रकारितेची स्वतंत्रता धोक्यात येते. लाचार पत्रकार कधीही निर्भीड पत्रकारिता करू शकत नाही.”
ते पुढे म्हणाले की, पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाल्यास संघटनेतील प्रत्येक सदस्याने त्या पत्रकाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. पत्रकार संघटना ही कोणताही दबावगट नसून एक कुटुंब आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याच्या सुख-दुःखात संघटनेने सहभागी व्हावे.
शिरूर तालुका कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष : सागर रोकडे
उपाध्यक्ष : सुनिल जिते
सचिव : योगेश शेंडगे
कार्याध्यक्ष : अर्जुन शेळके
खजिनदार : ओंकार भोरडे
संपर्कप्रमुख : अक्षय टेमगिरे
कोषाध्यक्ष : किरण पिंगळे-शेलार
प्रसिद्धीप्रमुख : आबासाहेब थोरात
कार्यकारी समिती अध्यक्ष : बाबा इनामदार
शिरूर शहराध्यक्ष : निलेश काळे
सहसंपर्क प्रमुख : धनंजय साळवे
नियोजन समिती अध्यक्ष (पुणे जिल्हा) : प्रफुल्ल बोंबे
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना डॉ. समीर राजे यांनी तालुक्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी दाखल होणाऱ्या खोट्या तक्रारींची शहानिशा करून संबंधित पत्रकारांना संघटनेमार्फत सहकार्य करण्याचेही त्यांनी सांगितले.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सागर रोकडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात कार्यरत पत्रकारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा प्रशासन किंवा राजकीय व्यक्तींकडून पत्रकारांचा आवाज दाबण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.