मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरोग्य

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.

डोळ्यांसाठी लाभदायक: मक्याच्या सेवनाने दृष्टी चांगली होते. ग्लूकोमा आणि मोतीबिंदू सारखे आजार दूर ठेवते.

हाडांसाठी उपयुक्त: यातील नैसर्गिक कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि किडनीच्या समस्यात लाभदायक आहे.

ब्लड शुगर नियंत्रित होते: कणसातील कार्बोहायड्रेट शरीराला ताबडतोब उर्जा देते. पचनशक्त वाढते, ब्लड शुगर कमी होते, वेट लॉससाठी लाभदायक आहे.

अ‍ॅनिमिया दूर करते: आयर्नच्या कमतरतेमुळे येणारा थकवा दूर होतो आणि प्रॉडक्टिव्हिटीचा स्तर वाढतो. हीमोग्लोबिनचा स्तर वाढतो. अ‍ॅनिमियावर हा रामबाण उपाय आहे.

हृदयासाठी लाभदायक: मक्क्यात कोलेस्ट्रॉल आणि सोडियम नसल्याने हृदयासाठी हे लाभदायक आहे.

पोटाच्या समस्या दूर होतात: पोटदुखी, अनियमित शौच, अतिसार, पोट फुगणे, बद्धकोष्ठतेत आराम मिळतो.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत