पुणे-नगर महामार्गावर भरधाव टँकरची दुचाकीला धडक; ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू; दिड महिन्यानंतर गुन्हा दाखल 

क्राईम मुख्य बातम्या

शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर टँकरचालकाने जखमींना मदत न करता तसेच पोलिसांना कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात अज्ञात टँकरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षा विलास गायकवाड (वय ४५, रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा प्रतीक विलास गायकवाड (वय २०) याने फिर्याद दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रतीक गायकवाड हा त्याची आई वर्षा गायकवाड यांच्यासोबत हिरो पॅशन प्रो दुचाकीवरुन शिरुरवरुन-कारेगावच्या दिशेने निघाला होता. सरदवाडी गावाच्या अलीकडे सुमारे एक किलोमीटर अंतरावर, टोयोटा शोरुमसमोरील अहिल्यानगर-पुणे मार्गावर त्यांची दुचाकी आली असता पाठीमागून आलेल्या पेट्रोल-डिझेल टँकर क्रमांक एम एच ४३ सीई ६५४६ ने दुचाकीला जोरदार धडक दिली.

टँकरचालकाने वाहन भरधाव वेगात, आणि निष्काळजीपणे चालवल्यामुळे हा अपघात झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. धडकेत वर्षा गायकवाड गंभीर जखमी झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित चालकाने वाहन थांबवून जखमींना उपचारासाठी नेण्याऐवजी घटनास्थळावरुन पलायन केले. याप्रकरणी २५ जुलै रोजी रात्री शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस हवालदार जगताप करीत आहेत.

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर तालुक्यात हॉटेलसमोर तरुणाला काठ्यांनी मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल…

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत