हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; ५७ कक्षांच्या सुसज्ज वास्तूचे लोकार्पण

महाराष्ट्र

मुंबई : मलबार हिल येथील पुनर्बांधणी करण्यात आलेल्या हायमाऊंट राज्य अतिथीगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. राज्यात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, परदेशी शिष्टमंडळे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या निवासासाठी हे अतिथीगृह सुसज्ज करण्यात आले आहे.

या नव्या अतिथीगृहात एकूण ५७ कक्ष असून, त्यामध्ये ६ व्हीव्हीआयपी आणि ५१ इतर कक्षांचा समावेश आहे. तळमजला अधिक आठ मजले अशी या इमारतीची रचना असून, आधुनिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि उच्च दर्जाचे आदरातिथ्य यांचा विचार करून वास्तूची उभारणी करण्यात आली आहे.

उद्घाटनावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार विश्वजित कदम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी अतिथीगृहाची पाहणी करून विविध सुविधांची माहिती घेतली. देश-विदेशातून राज्यात येणाऱ्या मान्यवरांना दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हे अतिथीगृह महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत