तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

आरोग्य

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू जेवतात, तर काही लोक प्रचंड घाई घाईने जेवतात. पण, घाई घाईने जेवण्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अनेकदा लोक १० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळात जेवण करतात. पण, त्यांची हीच सवय पचन, चयापचय आणि एकूण आरोग्यावर कसा परिणाम करू शकते हे त्यांना माहीत नसते. झटपट जेवल्याने जरी वेळ वाचत असला तरी त्याचा दीर्घकाळापर्यंत आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुम्ही नियमितपणे तुमचे जेवण घाई घाईने करता तेव्हा तुमच्या शरीरावर खरोखर काय परिणाम होतो.

१० मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी वेळात जेवण केल्याने पचन आणि पोषक तत्वांच्या शोषणावर कसा परिणाम होतो

१० मिनिटांपेक्षा कमी वेळात जेवण केल्याने पचन प्रक्रियेत आणि पोषक तत्वांचे शोषण होण्यास लक्षणीय अडथळे निर्माण होऊ शकतात. तोंडात घास टाकताच पचन प्रक्रिया सुरू होते, जिथे घास चावल्याने अन्नाचे कण तयार होतात आणि त्यात लाळ मिसळते. लाळेत अमायलेससारखे एंजाइम असतात, जे कार्बोहायड्रेटवर पचनक्रिया सुरू करतात. पण, घाई घाईने जेवताना अनेकदा घास नीट चावला जात नाही; परिणामी अन्नाचे मोठे कण पोटात जातात, ज्यामुळे अन्नाचे विघटन करण्यासाठी पोट आणि आतड्यांवर जास्त ताण येतो. परिणामी अपचन, पोटफुगी आणि आवश्यक पोषक तत्त्वांचे नीट शोषण होणे अशा समस्या निर्माण होतात.

घाई घाईने जेवताना नीट न चावलेल्या घासाचे विघटन करण्यासाठी पोटातील आम्लाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे छातीत जळजळ आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त जलद अन्न खाण्यामुळे आतडे-मेंदू यांच्यातील परस्पर संपर्क प्रक्रियेत व्यत्यय येतो, ज्यामुळे लेप्टिनसारखे हार्मोन्स जे पोट भरल्याचे संकेत मेंदूकडून आतड्याला पाठवले जातात ते सक्रिय होण्यासाठी २०-३० मिनिटे लागतात. परिणामी जास्त अन्न खाल्ले जाते आणि कालांतराने पोषक तत्वांचे शोषण कमी होते. जलद अन्न खाण्याच्या या सवयीमुळे अखेर लठ्ठपणा आणि चयापचय सिंड्रोमसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या होऊ शकतात.

जलद गतीने अन्न खाल्याने दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात का

जलद गतीने अन्न खाल्ल्याने “वजन वाढणे, पित्त उसळणे आणि चयापचय असंतुलन यांसारख्या दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जलद गतीने अन्न सेवनामुळे अनेकदा घास नीट चावला जात नाही, ज्यामुळे अन्नाचे मोठे कण तसेच पोटात जातात, ज्यामुळे पचनक्रियेवर ताण येतो आणि अपचन आणि पोटफुगी होण्याचा धोका वाढतो.

जलद गतीने अन्न खाल्ल्याने आतडे-मेंदूच्या परस्पर संपर्क प्रक्रियेतही व्यत्यय येतो, ज्यामुळे तृप्ततेला चालना देणारे हार्मोनल संकेत मिळण्यास उशीर होतो, ज्यामुळे जास्त अन्न खाल्ले जाते आणि वजन वाढण्याची शक्यता असते. जलद अन्न खाणे आणि मेटाबॉलिक सिंड्रोम विकसित होण्याचा धोका वाढणे याच्यात परस्परसंबंध आहे, जे उच्च रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइड्स वाढणे यांसारख्या परिस्थिती निर्माण होण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.

(सोशल मीडियावरून साभार)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत