विनोद कांबळींच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी शिंदेंनी घेतली; मुलांच्या शिक्षणाचाही खर्च उचलणार!

महाराष्ट्र

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. कांबळी पूर्णपणे बरे होईपर्यंत त्यांच्या वैद्यकीय उपचारांची संपूर्ण जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली असून, त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही घेण्यात येणार आहे. त्यामुळे आजारपण आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या कांबळी कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

विनोद कांबळी यांनी पत्नी अँड्रिया हेविट आणि मुले जीजस व जोहाना यांच्यासह आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी एमसीएचे प्रसिद्ध पीच क्युरेटर नदीम मेमन हेही उपस्थित होते. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना कांबळी यांनी शिंदे यांनी दिलेल्या मदतीची माहिती दिली.

कांबळी यांच्या मेंदूमध्ये रक्ताची गाठ झाल्याने ते गेल्या काही वर्षांपासून आजाराशी झुंज देत आहेत. त्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका असून, स्मरणशक्ती कमी होण्यासह अन्य आरोग्यविषयक समस्यांचाही सामना करावा लागत आहे. या आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी दीर्घकालीन वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी शिंदे यांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत